आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंदौर इन्फोलाइन प्रा. लिमिटेडच्या वतीने आयोजित व्हायब्रंट औरंगाबाद प्रदर्शन (इंडेक्सपो) ३ जूनपासून चिकलठाण्यातील कलाग्राममध्ये सुरू होत आहे. यामध्ये ६० टक्के स्टॉल्स औरंगाबादच्या उद्योजकांचे तर २० टक्के स्टॉल्स स्टार्टअप्सचे असतील. कलाग्राममध्ये ३ ते ५ जून दरम्यान आयोजित औद्योगिक आणि अभियांत्रिकी प्रदर्शनामुळे औरंगाबादेतील उद्योगांना गती मिळणार आहे. स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि इतर व्यापारी संघटना, एमएसएमई मंत्रालय भारत सरकारने देखील एक्स्पोला मान्यता दिली आहे. यात सहभागी होणाऱ्यांना सबसिडीही मिळाली आहे. भारतातील उद्योगात येणारे नवे ट्रेंड जसे की, औद्योगिक उपकरणांचे डिजिटलायझेशन, स्मार्ट उत्पादन प्रक्रिया, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बिग डेटा आणि मशीन लर्निंग, नियोजन आणि शेड्युलिंग याचा अनुभव उद्योजक आणि अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. शहरातील सर्वात मोठे प्रदर्शन : या प्रदर्शनात विविध औद्योगिक उत्पादनांचे १५ हजार युनिट्स पाहता येणार आहेत. औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूरसह देशभरातील सुमारे १२५ कंपन्या यात सहभागी आहेत. या उत्पादनांचा सहभाग : हैदराबाद, दिल्ली येथील उद्योजक त्यांची औद्योगिक ऑटोमेशन, मशीन टूल्स, बेअरिंग्ज, स्विच गियर्स यासारखी उत्पादने सादर करतील. वेल्डिंग उपकरणे, पॉवर टूल्स, हँड टूल्स, कटिंग टूल्स, वैज्ञानिक उपकरणे, प्रयोगशाळा उपकरणे, प्री-अभियांत्रिकी साहित्य, साहित्य हाताळणी उत्पादने, सुरक्षा उत्पादने, औद्योगिक सॉफ्टवेअर, सौरऊर्जा निर्मिती देखभाल उत्पादने, तापडिया टूल्स, ग्रौज टूल्स, ईस्टमॅन, ट्रेमोस, मरीन इलेक्ट्रिकल्स, किर्लोस्कर यांसारख्या अनेक आघाडीच्या कंपन्या कार्चर, टाटा कन्सल्टन्सी सहभागी झाले आहेत.
रोबोट्रिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्सला वाव या प्रदर्शनात बहुतांश स्टॉल्स रोबोटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील बदलांचे असतील. औरंगाबाद ऑटोमोबाइल, फार्मा, अॅग्रो, स्टील शिवाय इलेक्ट्रॉनिक बाजारात लक्ष वेधण्याच्या दृष्टीने काम करत आहे. प्रदर्शनातील स्टॉल्समुळे या क्लस्टरमध्ये नव्या कल्पनांना संधी मिळू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.