आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाळूज औद्योगिक परिसरातील एनआरबी बेअरिंग, स्वराज एंटरप्रायझेस, जिजाई एंटरप्रायझेस या तीन कारखान्यांतील ६५० कामगारांनी औद्योगिक सुरक्षिततेचे प्रशिक्षण घेऊन प्रात्यक्षिके सादर केली. कंपनीत अचानक आग लागल्यावर काय करावे, याबाबत एनआरबी बेअरिंग कंपनीमध्ये १०० कामगारांना मार्गदर्शनासोबतच प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या वेळी कामगारांनी आग नियंत्रणात आणण्याचे धडे घेतले.
औद्योगिक अपघात कसे टाळावेत याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. संबंधित मशीन, यंत्र चालवण्याबाबतचे अद्ययावत ज्ञान नसणे, प्रशिक्षणाचा अभाव, सुरक्षिततेसाठी पुरवण्यात आलेली सुरक्षा साधने न वापरणे किंवा कंपनीकडून ती पुरवली न जाणे, कंपनीत काम करताना डोक्यात इतर विचार, टेन्शन, एकाग्रतेचा अभाव, अपुरी प्रकाशयोजना, नादुरुस्त यंत्रे वापरणे यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. नवीन यंत्र व तंत्रज्ञानाची कामगारांना माहिती द्यावी, त्याचबरोबर एखादा अपघात, दुर्घटना घडल्यावर काय करावे, याबाबत त्यांना प्रशिक्षण द्यावे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे राम दहिफळे याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचे काम करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.