आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:शिक्षण प्रक्रिया न राबविण्याऱ्या शाळांची, शिक्षकांची माहिती द्या; जि.प. सीईओंचे आदेश

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

लॉकडाऊन काळात ऑनलाइन, ऑफलाइन, समुह गटपद्धतीने प्रक्रिया न राबविणाऱ्या शाळांची आणि शिक्षकांची माहिती कळवा. असे आदेश सर्व पंचायत समिती, विस्तार अधिकारी, प्राथमिक शाळांचे केंद्र प्रमुखांना जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गांेदावले यांनी दिले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यंदा जून महिन्यात शाळा सुरु होवू शकलेल्या नाहीत. मार्च महिन्यातच शाळांच्या परीक्षा न घेता सुट्या देण्यात आल्या होत्या. जून महिन्यात तरी शाळा सुरु होतील अशी आशा होती. परंतु अनलॉक नंतरही शाळा सुरु झालेल्या नाहीत. यावर शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या सूचना आणि नियमांचे पालन करत ऑनलाइन शिक्षण देण्यात यावे. शिक्षण प्रक्रिया थांबता कामा नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी लॉकडाऊनच्या काळातच ऑनलाइल , ऑफलाइन, समुह, गटपद्धतीने शिक्षण प्रक्रिया राबविण्यात यावी असे आदेश देण्यात आले होते. तसेच शासनाने प्रत्येक मुलांपर्यंत मोफत् पाठ्यपुस्तक पोहोच केलेले आहे. त्यानुसार वेळावेळी सूचनाही देण्यात आल्या होत्या. १६ ऑगस्ट रोजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील औरंगाबाद जिल्हयाच्या दौऱ्यावर आल्या असता सूचना केल्या होत्या. मात्र असे असतांना देखील शिक्षण विभागाकडे आलेल्या अहवालानुसार साधारपणे ५० टक्केच शाळांतून शिक्षण प्रक्रिया सुरु असल्याचे दिसून येत आहे. शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभागाचे अपर सचिव यांनी घेतलेल्या आढाव्यात सर्व शाळांतून प्रक्रिया का सुरु नाही? असा सवाल केला आहे. यावर आता सर्व विस्तार अधिकारी, पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकारी, शाळांचे केंद्र प्रमुख यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोणत्या शाळांतील कोणते शिक्षक लॉकडाऊन काळात ऑनलाइन, ऑफलाइन, समुह पद्धतीने शिक्षण प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत ? याचा शाळा निहाय अहवाल सादर करावा . तसेच ३१ ऑगस्टपर्यंत आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून शिक्षण सुरु नियोजन काय आहे याची माहिती देण्याचे आदेश पत्राद्वारे जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनी बुधवारी दिले

बातम्या आणखी आहेत...