आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती अभियान:मातोश्रीतील ज्येष्ठांना दिली मृत्युपत्र काढण्याची माहिती

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक जण मृत्युपत्र करून ठेवत नसल्याने वारसदारांना कायद्याच्या किचकट प्रणालीतून जावे लागते. त्यासाठी हयातीत मृत्युपत्र तयार करून ठेवल्यास वारसदारांचा वेळ व पैसा दोन्ही वाचवू शकतो, असे मत विधिज्ञ अॅड. मुक्तेश्वर खोले यांनी व्यक्त केले.पैठण रोडवरील मातोश्री वृध्दाश्रमात बुधवारी मृत्युपत्राविषयी जनजागृती अभियान कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन अॅड. ललित जोशी यांनी केले. या वेळी अॅड. खोले यांनी सांगितले, वृद्धाश्रमात राहूनही ज्येष्ठांना त्यांची मुले, सुना, मुलगी पॉपर्टीसाठी त्रास देतात. त्यामुळे मृत्युपत्र बनवणे महत्त्वाचे आहे. मृत्युपत्र बनवलेले नसेल तर भविष्यात वारसदारांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ, पैसा खर्च करावा लागतो. मृत्युपत्र असेल तर वारसदारांना कोर्टातून लिगल हेड सर्टिफिकेट प्लॅन काढून, आधार कार्डच्या माध्यमातून मालमत्तेचा लाभ घेता येते. मृत्युपत्र काढल्यानंतर कोर्टासमोर वाचन करून घ्यावे लागते. मृत्युपत्रानंतर जे काही बदल झाले त्याला कोडसील म्हटले जाते. या वेळी मातोश्री वृध्दाश्रमातील सागर पोगोरे, डॉ. स्मिता विवेक सावंत, अॅड. विद्या काशीनाथ खोले यांच्यासह मातोश्रीतील ४० जणांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...