आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋषिपंचमी उत्सव:राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे यांची माहिती

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चारूदत्त आफळे, ऋतुजा कुलकर्णी यांचा सत्कार

पेशव्यांनी पुण्यात वाडा बांधण्यापूर्वी गणपती मंदिर बांधले होते. तोच कसबा गणपती मानाचा पहिला गणपती आहे. १७६० मध्ये १ कोटी अष्टविनायक आवर्तनाचा संकल्प पेशव्यांनी सोडला होता. मात्र तो पूर्ण केला नाही. त्यामुळे पेशवाई बुडाली. संकल्प पूर्ण न केल्याने राज्य खंडित झाल्याचे लोकमान्य टिळकांना कळाले. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, असे प्रख्यात कीर्तनकार चारूदत्त आफळे यांनी सांगितले.

गणेश सभेच्या वतीने वरद गणेश मंदिरात ऋषीपंचमीनिमित्त गुरुवारी (१ सप्टेंबर) सायंकाळी चारूदत्त आफळे आणि तर्करत्न पुरस्कार प्राप्त विदुषी ऋतुजा बाळकृष्ण कुलकर्णी यांचा सत्कार झाला, त्या वेळी आफळे बोलत होते. मनोज पाडळकर यांनी प्रास्ताविक केले.

३८ वर्षांपासून ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांचा सत्कार
३८ वर्षांपासून गणेश महासभा दरवर्षी ऋषीपंचमीला सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करते. आतापर्यंत प्रा. राम शेवाळकर, प्रा. यु. म. पठाण, शिवाजीराव भोसले, पारनेरकर महाराज, अप्पा महाराज, डॉ. तात्याराव लहाने यांचा सत्कार गणेश सभेने केला आहे.

‘स्वातंत्र्यातील गणेशोत्सव’ विषयावर तीन दिवस कीर्तन
चारुदत्त आफळेंच्या तीन दिवसीय कीर्तनाचे आयोजनही करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ ते ८, तर शनिवारी, रविवारी सकाळी १० ते १२ या वेळात कीर्तनाचा लाभ घेता येईल. ‘भारतीय स्वातंत्र्यातील गणेशोत्सव’ या विषयावर हे कीर्तन होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...