आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Information Of Minister Atul Sawen That 80 Crores Will Be Provided For The Marathwada Liberation Struggle; What Aditya Thackeray Gave By Coming To Paithan Bhumre

हैदराबाद मुक्तीसंग्रामासाठी 80 कोटींचा निधी मिळणार:मंत्री अतुल सावेंची माहिती; आदित्य ठाकरेंनी पैठणमध्ये येवून काय दिले - भुमरे

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद मुक्तीसंग्रामसाठीच्या 75 वर्षाच्या निमीत्ताने मराठवाड्यात 50 ध्वज स्तंभ प्रत्येक जिल्ह्यात स्मृती भवन यासाह विवीध उपक्रमासाठी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी प्रस्ताव पाठवला होता.मागच्या सरकारने हा प्रस्ताव मंजुर केला.मात्र सरकार बदलल्यामुळे निधी मिळण्याबाबत अडचण निर्माण झाली होती. मात्र हा 80 कोटी रुपयांचा निधी लवकरच मंजुर होणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया पुर्ण झाली असून लवकरच हा निधी मिळणार असल्याची माहिती सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. दिव्य मराठीने याबाबत सातत्याने वृत्त प्रकाशीत करत मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निधीबाबतचा प्रश्नाबाबत सातत्याने वृत्त प्रकाशीत करुन यावर आवाज उठवला आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे 12 सप्टेंबरला पैठणमध्ये येणार आहेत.त्यासाठी शिंदे गट आणि भाजपा यांच्या माध्यमातून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यासाठी रोहयोमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट आमदार प्रदिप जैस्वाल आमदार रमेश बोरनारे उपस्थित होते

औरंगाबादच्या विकासासाठी प्रयत्न करणार

यावेळी बोलतांना सावे म्हणाले की मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या निधीसाठी आमचा पाठपुरावा सुरु आहे. 80 कोटीचा निधी यासाठी मंजुर होणार आहे. तसेच औरंगबाादच्या विकासासाठी देखील सर्व आमदार मंत्री आम्ही एकत्र येवून त्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले..तसेच पैठणमध्ये शक्तीप्रदर्शन नसून मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून जिल्ह्यात जास्तीत जास्त विकासाची कामे व्हावीत जास्तीचा निधी मिळावा यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरेंनी येवून काय केले

संदीपान भुमरे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांच्या सभेला पैठणमध्ये मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे ठाकरेंच्या सभेला हे उत्तर आहे का याबाबत विचारले असता आदित्य ठाकरेंनी येवून काय केले. अडीच वर्षात ते कधी आले नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आले. आता ते येवून काय करणार आहेत.त्यांनी त्यावेळी विकासकामाची संधी असतांना आले नाही असे सांगत आदित्य ठाकरेवर देखील हल्लाबोल केला.

संजय शिरसाठ मात्र शांत

या पत्रकार परिषदेत आमदार संजय शिरसाठ देखील हजर होते. संदीपान भुमरे बोलत असतांना अतुल सावे यांनी माईक हातात घेतला.त्यावर पत्रकारांनीएकनाथ शिदे बोलतांना देवेंद्र फडणवीस घेतात त्याप्रमाणे तुम्ही माईक घेत असल्याचे विचारले असता सावे म्हणाले की मी संदीपानभुमरे यांना बोलु का याबाबत परवानगी घेवून बोललो.तर भुमरे म्हणाले की मी त्यांना विनंती केली की बोला मी संजय शिरसाट यांना देखील विनंती केली की त्यांनी बोलावे मात्र ते बोलत नसल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...