आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसीने दिलेली माहिती चुकीची:विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका; म्हणाले - आरटीआय इतका फास्ट कधी झाला?

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी माहिती आधिकारावरुन जोरदार टीका केली आहे. वेदांता प्रकल्पाबाबत माहिती अधिकारात समोर आलेली माहिती चुकीची आणि खोटी आहे. सकाळी अर्ज केला आणि संध्याकाळी माहिती समोर येते? माहिती अधिकार कायदा एवढा फास्ट कधीपासून झाला? असा सवाल ही अंबादास दानवेंनी केला आहे.

नेमके काय म्हणाले दानवे?

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी पत्रकारपरिषद घेत वेदांताबाबत सर्व खुलासा केला होता. यावर त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी चर्चा करण्यासाठी देखील विचारणा केली होती मात्र सरकारने यावर काहीच प्रतिसाद दिला नाही, असा आरोपही अंबादास दानवेंनी केला आहे. माहिती आधिकारातील मुद्दे खोटे आहे.

वेदांत प्रकल्प दानवेंची प्रतिक्रिया

अंबादास दानवे म्हणाले की, या प्रकल्पावरून सरकार भ्रम निर्माण करतेय. आरटीआयमध्ये चुकीची माहिती देत आहेत. वेदांत प्रकल्पासाठी मविआ सरकारने सर्व प्रयत्न केले त्याची माहिती देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत बैठक घेतली त्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे. एकप्रकारे मविआ सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय.

भारत जोड़ो आंदोलन

अंबादास दानवे म्हणाले की, भारत जोडो यात्रा जेव्हा संपेल तेव्हाच कळेल यात कोण कोण सहभागी झाले. या यात्रेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील. लवकरच याबाबत स्पष्टता समोर येईल, यात कोण कोण सहभागी होणार आहे ते, सत्ताधार्यांना जे काही बोलायच ते बोलू द्या.

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना ईडीची नोटीस

विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले की, भाजप त्यांचे न ऐकणाऱ्या लोकांवर दबावतंत्राचा वापर करत आहे. महाराष्ट्र राज्यात नारायण राणे, प्रताप सरनाईक आणि यशवंत जाधव यांच्यावर भाजपने यापूर्वी ईडीच्या कारवाईची मागणी करत आहे. झारखंड असो किंवा महाराष्ट्र सर्वांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय. जे घाबरत नाही त्यांना थेट जेलमध्ये टाकण्यात येत आहे.

अंधेरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक

दानवे म्हणाले की, या निवडणुकीत भाजपने भीतीने आपला उमेदवार मागे घेतला. आता एक ऑडियो क्लिप समोर आली आहे. यात नोट देऊन नोटाचा वापर करण्यास सांगितले जात आहेत.काही केलं तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचाच नक्कीच विजय होईल.

बातम्या आणखी आहेत...