आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Injury To Women's Legs By Digging Roads In Vineyards; There Is No Running Water, Tenants Are Leaving Their Houses, There Is No Road For Tankers To Come | Marathi News

मागणी:अंगुरीबागेतील रस्ते खोदल्याने महिलांच्या पायांना इजा; नळाला पाणी नाही, भाडेकरू सोडताहेत घर, टँकर येण्यास रस्ता नसल्याने नागरिकांच्या घशाला कोरड

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रस्ता तयार करण्याची मागणी

अंगुरीबाग परिसरातील डोमनी मशिदीसमोरील मनपाने तीन महिन्यांपूर्वी ड्रेनेज व पाइपलाइनसाठी रस्ता खोदला होता. या ठिकाणी काँक्रीट व दगड टाकल्याने नागरिकांना रस्त्याने पायी चालणे कठीण झाले आहे. त्यामुळे तीन महिलांच्या पायांना इजा झाल्याचे महिलांनी सांगितले. पाइपलाइन फुटल्याने गेल्या तीन महिन्यांपासून इतर भागातून पिण्यासाठी पाणी आणावे लागते. या परिसरात टँकर सुद्धा आणता येत नाही. ज्येष्ठांना दवाखान्यात जाणे कठीण बनले आहे. हा रस्ता तयार करून नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.

खेड्यापेक्षा वाईट अवस्था : जयाबाई रौत्रे
खेड्यापाड्यातही ग्रामपंचायतीने चांगले रस्ते केले आहेत. शहरातील रस्ते तोडले. त्याचा मलबा तसाच ठेवल्याने ज्येष्ठांना चालता येत नाही. तीन महिन्यांपासून आम्ही त्रास सहन करत आहोत. मनपाने लक्ष द्यायला हवे.

जिवाशी खेळणे बंद करा : संजना गायकवाड
रस्ता खोदून ठेवल्याने दुसऱ्या भागातून पाणी आणताना पाय मुरगळला. दोन आठवडे घरात पडून होते. मनपा प्रशासनाने आमच्या जिवाशी खेळणे बंद करावे.

तीन महिन्यांपासून निर्जळी : खंडागळे
या भागात तीन महिन्यांपासून पाणीटंचाई सुरू झाल्याने भाडेकरू घर सोडून जात आहेत. या परिसरात पाणी, रस्त्याची समस्या आहे. भाडेकरू घर सोडून जात असल्याने आमचे उत्पन्नसुद्धा बंद होत आहे.

रस्ता दुरुस्त करावा : रशीदा बेगम
ज्येष्ठांना नेहमी उपचारासाठी दवाखान्यात जावे लागते. तरुणांना सुद्धा रस्त्यावरून चालता येत नाही. त्यामुळे ज्येष्ठांचे हाल होत आहेत. त्यामुळे मनपाने हा रस्ता दुरुस्त करावा.

बातम्या आणखी आहेत...