आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेतनही मिळाले नाही:व्हिडिओकॉन पतसंस्थेमध्ये अन्याय, ‘सहकार’चे दुर्लक्ष, 14 महिन्यांचे वेतन थकले, लाभांशही मिळेना

संतोष देशमुख | औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओकॉन ट्रेंड इलेक्ट्रॉनिक्स (व्हीटीई) कंपनी कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेत शेअर्स रक्कम व लाभांश दिला जात नाही. सभासदांनी जिल्हा उपनिबंधक व पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. याविषयी दिव्य मराठीने अधिक माहिती घेतली असता १४ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतनही मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले. शिवाय सहकार मंत्रालय आणि इतर यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचेही समोर आले.

पोलिस व सहकार विभागाला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सरासरी ८० ते ९० हजार रुपये शेअर्स रकमेवर मिळणारा वार्षिक लाभांश दोन वर्षांपासून पतसंस्थेकडून मिळालेला नाही. नवीन कर्जही देणेही बंद केले आहे. या जाचाला कंटाळून काही कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यांनाही शेअर्स रक्कम व लाभांश देण्यात आलेला नाही. असे महादेव ढेपे, मनीषा शिंपी, विजय डेडवाल, रामराज्य शेडगे, दिलीप जोशी आदींचे म्हणणे आहे.

जिल्हा उपनिबंधकांचे चौकशीचे आदेश ^दहा गंभीर गैरव्यवहाराच्या आरोपाची तक्रार केली. तालुका उपनिबंधकांना २० वर्षांपासूनच्या कारभाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. -अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा उपनिबंधक, औरंगाबाद.

बँकेने भरणा केला नाही ^कंपनी बँक चालवत आहे. वेतनातून पीएफ, सोसायटीचा हप्ता कपात केला जातो. मात्र, त्याचा भरणा होत नाही. डिसेंबर २०१९ पासून असेच सुरु आहे. या बाबत बँकेला निवेदन पाठवले आहे. सभासदांच्या तक्रारीत तथ्य आहे. -राहुल एरंडे, अध्यक्ष, व्हीटीई स. प.

बातम्या आणखी आहेत...