आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निकाल:दहावी- बारावी परीक्षेतील गैरप्रकारांची चौकशी सुरु, दोषी आढळल्यास निकाल राखीव ठेवणार

औरंगाबाद10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निकाल वेळेत लावण्यासाठी शिक्षण मंडळाची धावपळ सुरू आहे, त्यात सुनावणीला विलंब लागल्यास निकाल लावणे अशक्य होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी, मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणात दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांची सुनवाई 22 ते 30 जूनदरम्यान विभागीय मंडळाकडून सुरु आहे. यामध्ये दहावीच्या परीक्षेतील 177; तर बारावीच्या परीक्षेतील 379 अशा एकूण 556 विद्यार्थ्यांची सुनावणी होणार आहे. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेतात हे वेळापत्रक जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाऊ शकते. निकाल वेळेत लावण्यासाठी शिक्षण मंडळाची धावपळ सुरू आहे, त्यात सुनावणीला विलंब लागल्यास निकाल लावणे अशक्य होणार आहे.

शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षा सुरु असताना कोरोनाचा कहर देशात सुरु झाला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात दहावीचा शेवटचा एक पेपर रद्द ही करण्यात आला. त्यानंतर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनमुळे दहावी बारावी उत्तरपत्रिका तपासणीचा प्रश्नही निर्माण झाला. तसेच कॉपी प्रकरणातील दोषी विद्यार्थ्यांच्या सुनवाईची प्रक्रियाही रखडली. शिक्षक संघटनांच्या मागणीनंतर लॉकडाऊन काळात उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी देण्याची मुभा देण्यात आली. परंतु कॉपी प्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची सुनावणी शक्य शक्य नव्हती. कारण, सुनावणीसाठी विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयात यावे लागते. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यामुळे राज्यातील सर्व विभागांमध्ये कॉपी प्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची सुनावणी 22 जूनपासन सुरु आहे. औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळ सुनावणीची प्रक्रिया जिल्हानिहाय करण्यात येणार आहे. यासाठी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी व हिंगोलीसाठी वेळापत्रक निश्‍चित करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना उपस्थित राहून आपली बाजू मांडायची संधी दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दहावीच्या विद्यार्थ्यांची तर त्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांची सुनावणी होणार आहे.

अशी आहे विद्यार्थी सुनावणी प्रक्रिया
मंडळाच्या दहावी, बारावीच्या परीक्षेत भरारी पथकाला विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यानंतर पथक त्याच्यावर कारवाई करते. विद्यार्थ्याच्या दोषानुसार मंडळाची कारवाईची नियमावली आहे. यामध्ये एक परीक्षा ते पाच परीक्षापर्यंत बंदी घातली जाते. कॉपी प्रकरणाच्या सुनवाईत विद्यार्थ्याला आपले म्हणणे समितीसमोर मांडण्याची मुभा असते. यामध्ये विषय तज्ञ व मंडळाचे सेवानिवृत्त अधिकारी असतात. विद्यार्थ्याने केलेला गुन्हा लक्षात घेत कारवाई निश्चित केली जाते. त्यात विद्यार्थ्यांचे म्हणणे ही ऐकून घेऊन प्रकरणातली गंभीरता ही लक्षात घेतली जाते व त्यानंतर निर्णय निश्चित केला जातो. निकालापूर्वी ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाते.

बातम्या आणखी आहेत...