आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 तासांत केली आठ विभागांची तपासणी:राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या पथकाकडून घाटीची पाहणी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या नऊ अधिकाऱ्यांच्या पथकाने घाटीत तब्बल १२ तास ८ विभागांची तपासणी केली. यामध्ये बालरोग विभाग, प्रसूती विभाग, नेत्र, रेडिओथेरपी, बधिरीकरण तसेच इतर तीन विभागांची तपासणी करण्यात आली. विविध विभागांच्या वतीने वाढीव जागांची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित विभागात त्या मानकानुसार सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता ही टीम आली होती. त्यांनी रात्री साडेआठ वाजेपर्यंत पाहणी केल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर यांनी दिली.

वैद्यकीय महाविद्यालयांना नियमानुसार पदव्युत्तर विभागाच्या जागा दिल्या जातात. मात्र त्यासाठी आवश्यक असलेले शिक्षक, खाटाची संख्या, सर्व यंत्रसामग्री तसेच त्या अनुषंगाने पॅथॉलॉजी, सीटी स्कॅन, एमआरआय, एक्सरे मशीन मानकानुसार आहे की नाही याची तपासणी होते. त्यानंतर जागा वाढवण्यास परवानगी मिळते. तसेच ज्यांच्या सीट वाढवलेल्या आहेत त्यांचाही प्रत्येक पाच वर्षांनी आढावा घेतला जातो. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या नऊ अधिकाऱ्यांनी ही सरप्राइज व्हिजिट दिली. सर्व अधिकाऱ्यांना यंत्रणा आणि त्याबाबतची माहिती देण्यात आल्याची माहिती डॉ. कल्याणकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...