आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजी-२० च्या निमित्ताने शहराचे साैंदर्यीकरण सुरू आहे. यात सर्वाधिक हर्सूल टी पॉइंटच्या चौकाचे रूप बदलले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या चौकांकडे प्रशासनाने ढुंकूनही पाहिले नव्हते त्याचे एकदम रुपडे पालटले आहे. त्या ठिकाणी सुशोभीकरणाचे काम सुरू झाले आहे. या चौकात आता महापुरुषांचा पुतळा बसवण्यासाठी मागण्या समोर आल्या आहेत. तसे निवेदनही प्रशासकांना दिले आहे.
मराठा क्रांती मोर्चाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या चौकात बसवावा अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय चर्मकार संघटनेकडून संत रोहिदास महाराजांचा पुतळा बसवावा असे निवेदन दिले आहे, तर हर्सूल येथील स्थानिकांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बसवावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे या चौकात कुठल्या महापुरुषांचा पुतळा बसवावा असा प्रश्न प्रशासनासमोर पडला आहे.
गुरू रोहिदासांचा एकही पुतळा नाही
शहरात संत रोहिदासांचा एकही पुतळा नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे “द अनटचेबल’ पुस्तक संत रोहिदासांना अर्पण केले. शहरात ८० हजार चर्मकार बांधवाची संख्या आहे. त्यांच्या भावना लक्षात घेऊन या ठिकाणी गुरू रविदासांचा पुतळा बसवावा. डॉ. गोपाल बछिरे, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, मराठवाडा अध्यक्ष
आम्ही शहराच्या विकासासाठी जमिनी दिल्या
कृषी उत्पन्न बाजार समिती, हर्सूल तलावासाठी धनगर समाजाने आपल्या जमिनी दिल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी देशभरातील महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करीत संस्कृती जपली. प्रशासनाने येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा पुतळा बसवावा.– नारायण सुरे, सकल धनगर समाज.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.