आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारच्या १२० कोटी रुपये निधीतून घाटी रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटीची इमारत उभी राहिली. ३० कोटींची यंत्रसामग्री आली. चार डॉक्टर, ७६ नर्स, १५ तांत्रिक तर ६० कंंत्राटी चतुर्थश्रेणी कर्मचारी नियुक्त केले तर सरकारी रुग्णसेवा होऊ शकते, पण केवळ एवढी मनुष्यबळ भरती नको, असे कारण पुढे करून सुपरस्पेशालिटीच्या खासगीकरणाचा (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप - पीपीपी) घाट घातला जात आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या आमदार, खासदार, मंत्री अतुल सावे आणि केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनाही खासगीकरणाच्या निर्णयाची माहिती नाही. त्यामुळे यात काळेबेरे असावे, असा संशय तज्ज्ञ, अभ्यासक व्यक्त करत आहेत. इमारतीसह यंत्रसामग्री, काही डाॅक्टरही सरकारी मग हे कसले पीपीपी माॅडेल असा त्यांचा सवाल आहे. ३१ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पीपीपी रद्दची घोषणा केली होती. मात्र, शुक्रवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी खासगीकरण होणारच, असे सांगितले. या मागे नेमके काय आहे, हे जाणून घेण्यासाठी दिव्य मराठी प्रतिनिधीने काही तज्ज्ञ, अभ्यासकांशी संवाद साधला. तेव्हा असे लक्षात आले की, सुपरस्पेशालिटीला प्रथम टप्प्यात २१९ जागा मंजूर आहेत. त्यातील प्राध्यापक संवर्गाच्या १३ पैकी ९ जागा भरल्या आहेत. तांत्रिक संवर्गात मंजूर १८ पैकी चार तर नर्सच्या सर्व ७६ जागा रिकाम्या आहेत. शिवाय एक मेट्रन आणि चार इन्चार्ज सिस्टरच्या जागा भरायच्या आहेत. नर्स भरती दोन महिन्यांत अपेक्षित आहे. सुपरस्पेशालिटीच्या आठ विभागांत आठ महिन्यांमध्ये २० हजार रुग्णांवर उपचार झाले.
छत्रपती संभाजी नगरात दीडशे कोटी रुपयांत हे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्यात आले. जनतेचा दबाव नसल्यानेच सारे प्रयोग जनतेचा दबाव नसल्यामुळेच खासगीकरणाचे सर्व प्रयोग इथे होतात. मला पीपीपीबाबत कुठलीही माहिती नव्हती. मी माझ्या उच्च न्यायालयाच्या याचिकेत हा विषय मांडणार आहे. पीपीपी जनतेच्या सेवेसाठी नाही तर नफेखोरीसाठी आहे. चालवायला घेणारे डॉक्टर गरिबांसाठी नाही तर धंद्यासाठी येणार आहेत. -इम्तियाज जलील, खासदार
सरकारी दवाखाने पळवले जात आहेत सरकारकडून दवाखाने बांधून घेत ते मंत्र्यांच्या गोतावळ्यातील लोक पळवून नेत आहेत. मराठवाडा, विदर्भासारख्या ग्रामीण भागात सुपरस्पेशालिटीची सेवा मिळावी यासाठीच केंद्राने एवढा पैसा खर्च केला. मग त्याचे खासगीकरण कोणाच्या फायद्यासाठी सुरू आहे? इमारत, यंत्रसामग्री आणि काही डॉक्टर सरकारचे तर खासगी पार्टनरशिप कशाची? फक्त पैसे कमावण्याची का? याविरुद्ध मराठवाड्यातील लोकांनी लढा उभारला पाहिजे. -डॉ. अशोक बेलखोडे, माजी सदस्य, मराठवाडा मंडळ
कॅबिनेटमध्ये निर्णय होईल सध्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी फक्त प्रस्ताव मागवला आहे. पीपीपीचा निर्णय कॅबिनेटमध्ये होईल. त्यावेळी त्यावर चर्चा केली जाईल. -अतुल सावे, सहकारमंत्री

Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.