आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Instead Of Increasing The Allowance Given To The Students In The Zilla Parishad Schools, The Coroner's Reason Was Given And The Allowance Was Not Paid As The School Was Closed.

औरंगाबाद:सावित्रीच्या लेकींच्या उपस्थिती भत्याकडे सरकार दरबारी उदासिनताएक रुपये भत्ता की थट्टा

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थींना शाळा बंद असल्याने भत्ताच देण्यात आलेला नाही

एकीकडे मुलींचे शिक्षणात प्रमाण वाढावे, त्यांनी नियमित शाळेत याव. यासाठी बेटी बचाव बेटी पढावचा नारा देण्यात येतो. परंतु त्याच मुलींच्या उपस्थिती वाढविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थींना देण्यात येणाऱ्या भत्यात वाढ करण्याऐवजी कोरोनाचे कारण पुढे करत आणि शाळा बंद असल्याने भत्ताच देण्यात आलेला नाही. तेंव्हा हा भत्ता वेळेत देण्याबरोबरच त्यात वाढ करण्यात यावी अशी मागणी शिक्षक समितीने केली आहे.

शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलींची उपस्थिती शाळेत नियमित रहावी, वाढावी याबरोबरच त्यांच्या बालविवाहाचे प्रमाण थांबावे या हेतूने १९९२ पासून विद्यार्थीनी उपस्थिती भत्ता शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली होती. राज्यभरातील पहिली ते चौथीच्या वर्गातील मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थीनींसाठी योजना लागू करण्यात आली. त्या अंतर्गत मुलींना रोज एक रुपया उपस्थिती भत्ता लागू करण्यात आला. लाभार्थींना दरमहा किमान ८० टक्के उपस्थिती आवश्यक असते. इतक्या वर्षात अनेक नवीन योजना आल्या, नियम बदलले, महागाई वाढली आहे. दुर्गम भागातून विद्यार्थीनी शाळेत येतात. तरी देखील भत्त्यात अद्याप वाढ झालेली नाही. तेेंव्हा मुलींच्या शिक्षणाची काळजी असल्याचे बोलवून दाखविण्यापेक्षा शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करावी अशी मागणी शिक्षक समितीने केली असून, पालकांनी देखील यात वाढ व्हायला हवी. कोरोनामुळे पालकांच्या हातचे काम गेले आहे. ज्या मिळणाऱ्या शिष्यवृत्ती आणि भत्त्याकडून अपेक्षा होती. ती देखील आता वेळेत मिळत नसल्याने अडचणीत वाढत होते आहे. असेही पालकांनी म्हटले आहे. अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थीनींची शाळेत उपस्थिती वाढावी. विद्यार्थीनी शाळाबाह्य होवू नये.यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. प्रतीदिन एक रुपये प्रमाणे हा प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. परंतु शासनाने सांगितले की, १५ जून पासून शाळाच सुरु नसल्याने विद्यार्थीनी शाळेतच आल्या नाहीत. त्यामुळे यंदा भत्ता देण्यात येणार नाही.- सूरजप्रसाद जयस्वाल प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद

आज २९ वर्ष विद्यार्थीनी उपस्थिती भत्ता योजना सुरु करुन झाली आहे. त्यात अजूनही वाढ झालेली नाही. असे असतांना यंदा शाळा बंद आहेत. असे कारण पुढे करत सरकारने देय असलेली रक्कम दिलेली नाही. मग अशा परिस्थितीत मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन कसे मिळणार. यात भत्त्यात वाढ करुन तो नियमित वेळेत मिळावा अशी मागणी आहे.-विजय साळकर जिल्हाध्यक्ष शिक्षक समिती

बातम्या आणखी आहेत...