आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्राचार्य, पदवी स्तरावरील आणि पदव्युत्तर पदवीच्या सहायक प्राध्यापकांच्या पदभरतीला मुदतवाढ देण्यात यावी, अकॅडमिक ऑडिट केलेल्या कॉलेजची मुदत संपेपर्यंत पुर्नपडताळणी करू नका, अशी आग्रही मागणी संस्थाचालकांसह विद्यापीठातील विविध प्राधिकरणांच्या सदस्यांनी केली आहे. संस्थाचालकांनी आज प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांची भेट घेतली. त्यावेळी विद्यापीठामार्फत सुरू असलेल्या विना अनुदानित कॉलेजांवरील कारवाईच्या संदर्भात शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली.
शिष्टमंडळाने प्र-कुलगुरूंना सांगितले की, महाविद्यालयाने रोस्टर दाखल केल्यानंतर व रोस्टर मंजूर होऊन जाहीरात, विहित निवड समितीद्वारे निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी द्यावा, विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राचार्य पदांच्या भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ करावी, अकॅडमिक ऑडिट झालेल्यांना विद्यापीठाकडून प्रमाणपत्र दिले आहे, अशा महाविद्यालयांची पुर्नतपासणी त्यांच्या मंजूर कालावधी शिल्लक असेपर्यंत करू नका, विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राचार्य पदांच्या भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ करा, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी दोन पदव्युत्तर अध्यापक नियुक्त करण्याऐवजी एक पदव्युत्तर अध्यापक नियुक्त करण्याची परवानगी देण्यात यावी, विनाअनुदानित महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांच्या शुल्कामध्ये शुल्क समितीद्वारे वाढ करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
व्यवस्थापन परिषदेतील संस्थाचालकांचे प्रतिनिधी संजय निंबाळकर, माजी सदस्य शिवाजी मदन, विद्यमान सदस्य डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे, अधिसभा सदस्य भगवानसिंग ढोबाळ, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य संतोष लोमटे, डॉ. गोपालसिंह बच्छिरे, अधिसभा सदस्य डॉ. भारत खैरनार, अधिसभा सदस्य प्रा. सुनील मगरे, प्रा. हरि जमाले यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.