आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपाल निघाले दौऱ्यावर:प्रत्यक्ष जाउन माहिती घेतल्यावरच परिस्थिती लक्षात येते, संविधनाने मला अधिकार दिले; राज्यपालांनी हिंगोलीतील अधिकाऱ्यांशी केली चर्चा

हिंगोली2 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • राज्यपाल कोश्‍यारी यांनी डॉ. राठोड याचे अभिनंदन करून कौतूक केले.

हिंगोली जिल्हयातील सिंचनाची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी शुक्रवारी ता. 6 विविध विभागांच्या आढावा बैठकीत दिल्या आहेत. येथील शासकिय विश्रामगृहात राज्यपाल कोश्‍यारी यांनी विविध विभागांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर, एकात्मीक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्पाधिकारी डॉ. विशाल राठोड, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, अतुल चोरमारे यांच्यासह आरोग्य विभाग, लघुसिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, राज्यपाल कोश्‍यारी यांनी जिल्हयातील सिंचनाची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या. जमीन संपादनाची प्रक्रिया तातडीने पार पाडून नवीन कामे सुरु करावीत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन पाचही तालुक्यांमधून लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या. यावेळी आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या कामकाजाची प्रकल्प अधिकारी डॉ. राठोड यांनी माहिती दिली. आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या शाळा, त्यातून दिले जाणारे शिक्षण, स्वच्छते विषयक उपक्रम तसेच विविध योजनांची माहिती दिली. प्रकल्पाचे कामकाज पाहून राज्यपाल कोश्‍यारी यांनी डॉ. राठोड याचे अभिनंदन करून कौतूक केले.

दरम्यान, त्यानंतर राज्यपाल कोश्‍यारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे उपस्थित होते. यावेळी बोलतांना कोश्‍यारी म्हणाले की, संविधनाने राज्यपालांना राज्यातील विकास कामे, सिंचनाची कामे, अनुसुचीत जमातीच्या विकासाची कामे याची माहिती घेण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसारच काम करीत असून प्रत्यक्ष जिल्ह्यात जाऊन माहिती घेतल्यानंतर तेथील परिस्थिती लक्षात येते. यामुळेच हा दौरा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंगोली जिल्हयासह राज्यातही इतर भागात सिंचनाच्या अपूर्ण योजना असून बहुतांश योजना योग्य मोबदला न दिल्याने अपूर्ण असल्याचे दिसून आले आहे. जमीन संपादनाच्या चारपट मोबदला दिल्यानंतरही जमीनी दिल्या पाहिजेत असे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...