आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवाजीनगरच्या भारतनगर परिसरात मनपाच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. रहिवासी तीन महिन्याला प्रति कुटुंब ११२० रुपये मनपा प्रशासनाला देतात. महिन्यातून किमान १५ ट्रिप पाणीपुरवठा होणे अपेक्षित असताना कधी आठ, तर कधी फक्त दहा ट्रिप पाणी दिले जाते, तेही दूषित. पैसा देऊनही अपुरे पाणी दिले जात असल्याने आम्ही त्रस्त आहोत. प्रशासनाने वेळेवर आणि मुबलक शुद्ध पाणी द्यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
शिवाजीनगरमधील भारतनगर परिसरात २० हजारपेक्षा जास्त लोकवस्ती आहे. या परिसरात मनपातर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. महिन्यातून किमान १५ दिवस पाणी मिळणे अपेक्षित असताना केवळ आठ ते दहा दिवस पाणी दिले जाते, तेही दूषित असते. टँकर लॉबी मापात पाप करत असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. दरवेळी टँकरचा ड्रायव्हर बदलतो. चार ते पाच दिवसांनंतर पाणी का आणले? असे विचारले असता , ‘मी नवीन आहे. टँकर खराब झाले होते. टाकीवरची मोटार जळाली होती. पाइपलाइन फुटली होती,’ अशी उत्तरे देत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
दूषित पाणीपुरवठा महानगरपालिका शुद्ध पाणी देण्याचा दावा करते, परंतु आम्हाला पिवळ्या रंगाचे दूषित पाणी दिले जाते. - शोभाबाई पवार
आम्ही तक्रारी किती आणि कोणाकडे कराव्यात? आम्ही वारंवार पाण्याच्या टाकीवर जाऊन तक्रार करतो, परंतु त्याची काही दखल घेतली जात नाही. आम्ही तक्रार करायची तर कोणाकडे आणि किती वेळा? आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळत नाही. - अलका साबळे, रहिवासी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.