आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही शेतकऱ्यांना उशिराने भरपाई देता त्याचे काय?:कृषिमंत्री सत्तारांच्या सवालाने विमा कंपनी अधिकारी निरुत्तर

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उशिरा तक्रार केली, असे सांगून शेतकऱ्यांचे दावे फेटाळता. पण तुम्ही भरपाई उशिरा देता त्याचे काय, असा सवाल कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कंपन्यांना केल्यामुळे कंपनीचे अधिकारी निरुत्तर झाले.

गुरुवारी (१० नोव्हेंबर) पीक विमा आढावा बैठकीत सत्तार अधिकाऱ्यांना म्हणाले की, आॅफलाइन तक्रारीही मान्य करा. जुलै, ऑगस्टमधील नुकसानीची भरपाई राज्य सरकारने सप्टेंबरमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली, असे पहिल्यांदाच झाले आहे.

गुलाबपुष्पाच्या पाकळ्यांचा वर्षाव सुळे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबाबत सत्तार यांचे कपडे फाडणाऱ्याला दहा लाख रुपयांचे बक्षीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या जालना येथील महिला पदाधिकाऱ्याने जाहीर केले. त्याची अंमलबजावणी गुरुवारी होते की काय, अशी शंका अनेकांना होती. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. उलट सुभेदारीवर सत्ता समर्थकांनी गुलाबपुष्पाच्या पाकळ्यांचा वर्षाव सत्तारांवर केला.

बातम्या आणखी आहेत...