आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:गुजराती कन्या विद्यालयातर्फे 21 डिसेंबरला आंतरशालेय नाट्य उतारा सादरीकरण स्पर्धा

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री गुजराती कन्या विद्यालयात पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २६ व्या आंतरशालेय नाट्य उतारा सादरीकरण स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा २१ डिसेंबरला होणार असून ८ वी ते १० वीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेत दोन विद्यार्थ्यांचा संघ पाठवायचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतंत्र सादरीकरण करावे. नाट्य उतारा सादरीकरणासाठी चार मिनिटांचा अवधी राहील. मराठी किंवा हिंदी भाषेतून उतारा सादर करता येईल. नाट्य उतारा नाट्यसंहितेतील, स्वरचित किंवा पाठयपुस्तकातील असावा. स्पर्धेत भरघोस पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धा गोकुळनाथ मोहल्ला येथील श्री गुजराती कन्या विद्यालयात होईल. स्पर्धेसाठी १२ डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करावी. नोंदणीसाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. शहरातील शाळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...