आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकहाती सत्ता:बाजार समिती निवडणुकीत अंतर्गत‎ एकोपा नसल्याने महाआघाडीला फटका‎, भुमरे यांचा करिष्मा कायम

पैठण‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण कृषी उत्पन्न बाजार‎ समितीच्या निवडणुकीत संदिपान ‎ भुमरे यांची एकहाती सत्ता‎ प्रस्थापित झाली आहे, तर‎ महाविकास आघाडीला त्यांच्याच ‎ ‎ नेत्यांमध्ये अंतर्गत एकोपा‎ नसल्यामुळे पराभवाला सामाेरे‎ जावे लागले आहे.‎

महाविकास आघाडीमध्ये‎ काँग्रेसचे माजी मंत्री अनिल पटेल, ‎ ‎ राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार ‎ ‎ संजय वाघचौरे, दत्तात्रय गोर्डे, ‎ ‎ अप्पासाहेब निर्मळ, काँग्रेसचे‎ विनोद तांबे, शिवसेना ठाकरे‎ गटाचे मनोज पेरे यांनी बाजार‎ समिती निवडणुकीत महाविकास‎ आघाडी केली, तर पालकमंत्री‎ संदिपान भुमरे, माजी सभापती‎ विलास भुमरे यांनी प्रत्येक‎ ‎‎ मतदारावर फोकस करत एकहाती‎ सत्ता बाजार समितीत आणली.‎

यात भाजप नावापुरता भुमरेंबरोबर‎ राहिला असून काँग्रेसचे रवींद्र‎ काळे भुमरे यांच्याबरोबर हाेते.‎ आठ दिवस प्रचारात महाआघाडी‎ विरुद्ध भुमरे असा सामना रंगला‎ हाेता. मात्र, निकाल भुमरे यांच्या‎ बाजूने एकतर्फी राहिल्याने‎ महाविकास आघाडीचे‎ निवडणुकीतील गणित चुकल्याचे‎ दिसून आले.

पालकमंत्री भुमरे‎ यांच्यासह महाविकास‎ आघाडीच्या स्थानिक सर्व‎ नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई‎ म्हणून या निवडणुकीकडे सर्वांचे‎ लक्ष लागून हाेते. पालकमंत्र्यांचे‎ पुत्र विलास भुमरे यांनी या‎ निवडणुकीची सर्व सूत्रे आपल्या‎ हाती घेत बाजार समिती‎ निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले‎ होते, तर महाविकास आघाडीच्या‎ नेत्यांनीदेखील अनेक ठिकाणी‎ बैठका घेत आपल्या उमेदवारांना‎ निवडून देण्याचे आवाहन केले‎ हाेते.‎ या निवडणुकीत मंत्री भुमरे‎ यांनी वर्चस्व सिद्ध केले.‎

भुमरे यांचा करिष्मा कायम‎ बाजार समिती निवडणुकीसाठी‎ ठरावीक मतदार असले तरीही‎ याकडे सर्व नेत्यांनी लक्ष घातले‎ हाेते. पालकमंत्रिपद भुमरेंकडे‎ असल्याने आपल्या तालुक्यातील‎ महत्त्वाची संस्था ताब्यात असावी‎ यासाठी भुमरे सुरुवातीपासूनच‎ बाजार समितीवर लक्ष ठेवून हाेते.‎ भुमरे यांच्या हाती सत्ता आल्याने‎ त्यांचा करिष्मा कायम असल्याचे‎ सिद्ध झाले.‎