आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाण, कार्गो सेवा सुरू व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न होत आहेत. मात्र अद्यापही त्याला यश आलेले नाही. औरंगाबाद हे औद्योगिक शहर आहे. येथे मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यात होते, मात्र त्यासाठी फक्त रस्ते व रेल्वेमार्गाचाच पर्याय आहे. सुमारे अडीच हजार कोटींच्या मालाची दरवर्षी निर्यात क्षमता असूनही आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेबाबत अद्याप गांभीर्याने विचार झालेला नाही. या सेवेसाठी जुन्या विमानतळाच्या जागेत कस्टमचे सुसज्ज कार्यालयही उभारण्यात आले आहे, मात्र सेवाच सुरू नसल्याने तेही धूळ खात आहे. दरवर्षी २० हजार लोक औरंगाबादेतून हज यात्रेसाठी जातात. यासोबतच आखाती देशात जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. शहरातील अनेक कुटुंबातील सदस्य नोकरीच्या निमित्ताने परदेशात आहेत.
मेडिकल हब असलेल्या औरंगाबादेत मेडिकल टुरिझमसाठी येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पर्यटनासाठीही अनेक विदेशी पर्यटक दरवर्षी येत असतात. त्यामुळे येथील विमानतळावर विदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी इमिग्रेशन सेंटर असावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी यासाठी सर्व जुळवाजुळवही केली आहे. मात्र, अद्याप त्याला यश मिळालेले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.