आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शंकर नागरी सहकारी बँकेचे १४ कोटी ४६ लाख आयडीबीआय बँकेच्या खात्यातून आरटीजीएसच्या माध्यमातून हॅकर्सनी लंपास केले हाेते. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य कनेक्शन उघड झाले. नांदेड गुन्हे शाखेने नव्याने ४ आराेपींना कर्नाटकच्या धारवाडमधून ताब्यात घेतले. यापूर्वी ६ जणांना अटक झाली असून एकूण आराेपींची संख्या १० झाली आहे.
रक्कम हॅक प्रकरणात पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी तपास करण्यासाठी वेगवेगळी पथके स्थापन केली होती. शिवाय सायबर क्राइम सेलची टीमही यासाठी कामाला लागली होती. सायबर सेलच्या माध्यमातून तपास युगांडा देशातील एका आरोपीपर्यंत पोहोचला. रुमानिका रोनॉल्ड पी किटा सिबवा (२२, रा. म्परवे कमपका), केनियातील आयव्ही मोनुके केनेडी नेबुतो (२४, रा. महाली, आयसीपो), गलाबुजी मुकिसा रॉबर्ड पी गलाबुजी फेड (२३, रा.बुसुकुमा, किरवेडा, युगांडा), प्रियंका पी. गोविंद अप्पा सावनू माळवदे (३६, रा. मयूरी इस्टेट, केशवपूर, हुबळी) या सर्वांना कर्नाटक राज्यातील धारवाड येथील गिरिनगरमधील सय्यद रेसिडेन्सी फ्लॅट नंबर १८/१९ फर्स्ट कॉस येथून सायबर सेलच्या मदतीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लॅपटॉप, सहा मोबाइल, दोन डोंगल, आठ चेकबुक, पाच पासबुक, तेरा डेबिट कार्ड असे साहित्य पथकाने जप्त केले. आरोपींना पुढील तपासासाठी वजिराबाद पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, आरोपींना न्यायालयात हजर केले असता मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी ५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.