आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय आंतर शालेय रायफल शूटिंग स्पर्धेत कोल्हापूर विभागाच्या संघाने ११ पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. पुणे विभागाने १४ पदकांसह उपविजेतेपद तर यजमान छत्रपती संभाजीनगर संघाने ५ पदकांसह तृतीय क्रमांक मिळवला.
एमजीएम विद्यापीठ आणि अजंठा रायफल व पिस्टल शूटिंग रेंज येथे ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत एकूण ४०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.
विजते खेळाडू पुढीलप्रमाणे
ओपन साईट एअर रायफल १४ वर्षे मुले - श्लोक राऊत (कोल्हापूर), वर्धन रेडेकर (कोल्हापूर), शिवम भुसारे (नाशिक). मुली - गौरी ढवळे (पुणे), सान्वी नाळे (कोल्हापूर), ईशिता काकडे (पुणे). १९ वर्षे मुले - ओंकार राठोड (लातूर), सार्थक वारले (पुणे), अथर्व भावसार (नाशिक). मुली - मोहिनी गावीत (पुणे), हर्षाली पाहुजा (नाशिक), रितू मासोदकर (अमरावती).
पिस्टल प्रकार १४ वर्षे मुले - राजवर्धन साखरे (कोल्हापूर), प्रथमेश कदम (पुणे), देवांश पाटील (मुंबई). मुली - निर्भई गिरासे (पुणे), ऋतू दरेकर (मुंबई), आरोही देशपांडे (छत्रपती संभाजीनगर).
१७ वर्ष - हर्षवर्धन पाटील (कोल्हापूर), सिमरजित सिंग (पुणे), आदित्य झेंडे (मुंबई). मुली - गौरी साळोखे (क्रीडा प्रबोधिनी), अंजली भागवत (नाशिक), जान्हवी मानतकर. १९ वर्षे - अथर्व साळोखे (कोल्हापूर), शुभम शिंदे (पुणे), सौरभ दहिवाळ (नाशिक). मुली - रिया थत्ते (छत्रपती संभाजीनगर), कृष्णाली राजपूत (छत्रपती संभाजीनगर), चिन्मयी आळंदकर (पुणे).
पिप साईट एअर रायफल प्रकार १४ वर्षे मुले - प्रीतम शिंदे (पुणे), अर्जुन कदम (पुणे), सिद्धांत सोनवणे (छत्रपती संभाजीनगर). मुली - स्वरा मगदूम (कोल्हापूर), आय पाटील (मुंबई), रिया कडू (अमरावती). १७ वर्षे - वेदांत पाटील (मुंबई), आदित्य जगताप (नागपूर), वेदांत वाघमारे (पुणे). मुली - अन्वी राठोड (मुंबई), शांभवी क्षीरसागर (कोल्हापूर), अनुष्का ठाकरे (पुणे). १९ वर्षे - गौरव देसले (नाशिक), अथर्व पाटील (कोल्हापूर), वेदांत इखार (अमरावती). मुली - परिघा बेले (छत्रपती संभाजीनगर), वैष्णवी जाधव (क्रीडा प्रबोधिनी), ए. प्रज्ञश्री (मुंबई).
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.