आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागारखेड्यातील अट्टल गुन्हेगार साईनाथ उर्फ पिण्या ऊर्फ प्रतीक गणेश खडके (रा. भारतनगर, गारखेडा) याच्यावर एमपीडीएअंतर्गत कारवाई करत हर्सूल कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पुंडलिकनगर परिसरातील वाढती गुन्हेगारी थांबवण्यासाठी पोलिसांनी आता कठोर पावले उचलली असून जवळपास आणखी दहापेक्षा अधिक गुन्हेगार तडीपार व एमपीडीएच्या प्रस्तावाधीन आहेत. साईनाथवर महिलांवर हल्ला करणे, विनयभंग, खुनाचा प्रयत्न, चोरी, गंभीर दुखापतीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
वारंवार कारवाया करुनही त्याच्या गुन्हेगारीमध्ये फरक पडत नव्हता. त्यामुळे निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी एमपीडीए कारवाईसाठी प्रस्ताव तयार केला होता. आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहायक आयुक्त विशाल ढुमे, निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक एस. के. खटाणे, उपनिरीक्षक रामदास सुरे, द्वारकादास भांगे, महादेव दाणे, शिवाजी गायकवाड, राजेश यदमळ यांनी कारवाई करत त्याला ४ जानेवारी रोजी कारागृहात स्थानबद्ध केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.