आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महालक्ष्मीं:उद्या सकाळी 9 ते रात्री 9 करा महालक्ष्मींचे आवाहन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरोघरी गणराय विराजमान झाल्यानंतर आता गृहिणींना वेध लागले आहेत ते श्री महालक्ष्मी (गौरी) आवाहनाचे. गणपती रिद्धी-सिद्धीसह आल्याने भक्तांना विद्या प्राप्ती होते. तसेच महालक्ष्मीमुळे सौभाग्याचे रक्षण होते. लक्ष्मीची कृपादृष्टी अखंड राहण्यासाठीही महालक्ष्मीचे पूजन केले जाते. भाद्रपद सप्तमी, अष्टमी आणि नववी असे तीन दिवस हा सण असतो. त्यात १६ अंकाला विशेष महत्त्व असते. त्यामुळे महानैवेद्यात १६ पदार्थ केले जातात. १६ सुताचा धागा हातात बांधला जातो.

अनाथाश्रमातील नऊ विद्यार्थ्यांचा सत्कार
औरंगाबाद | आदर्श मित्रमंडळातर्फे अनाथाश्रमातील ९ गुणवंत विद्यार्थांच्या सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूसाहेब लगड यांनी केले. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो. तसेच भविष्यात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.

वरद गणेश मंदिरात ७ सप्टेंबरला होणार सामूहिक अथर्वशीर्ष पठण
औरंगाबाद | गणेश सभा, विद्या भारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान आणि विश्व ब्राह्मण सेवाभावी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थनगर येथील वरद गणेश मंदिरात ७ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. १३ वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या सोहळ्यात आजवर ८ हजार भाविकांनी पठण केले आहे. काेविडनंतर यंदा तीन संस्थांचे एकत्रित आयोजन असल्याने १ हजार भाविक पठणात सहभागी होतील.

बातम्या आणखी आहेत...