आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आव्हान:700 काेटींचे सट्टा मार्केट; तासाभरात जामीन, पुन्हा बाजारात उसळी, यवतमाळचे 3 बुकी राज्यात चालवतात सट्टेबाजी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: एकनाथ पाठक
  • कॉपी लिंक
  • सट्टेबाजीमध्ये हवाल्यावर काेट्यवधींचा व्यवहार

टी-२० ने क्रिकेटला माेठी उंची मिळवून दिली आणि युवा खेळाडूंच्या प्रतिभेला चालना मिळाली. मात्र, याच लाेकप्रियतेचा कळस गाठणाऱ्या छाेट्या फाॅरमॅटचा वापर झटपट श्रीमंतीसाठी हाेत आहे. त्यामुळे आजच्या घडीला एकट्या महाराष्ट्रात आयपीएलच्या सामन्यांवरील बेटिंगमुळे ७०० काेटींचे सट्टा मार्केट तेजीत आले आहे. यात ६० सामन्यांचा समावेश आहे. गत १९ सप्टेंबरपासून १३ व्या सत्राच्या आयपीएलला सुरुवात झाली. आतापर्यंत दहा सामने झाली आहेत. यासाठी राज्यातील नागपूर, पुणे, आैरंगाबाद, यवतमाळ, अकाेला, मुंबईसारखी शहरे सज्ज झाली आहेत. राज्यात प्रत्येक सामन्यावर साधारणपणे सुरुवातीला २० काेटींचा सट्टा लागत आहे. यासाठी खास अॅपही विकसित झालेले आहे.

शे-दाेनशेच्या सट्ट्यातून काेट्यवधींच्या कमाईसाठी आता बुकीसह क्रिकेटचे चाहतेही सरसावले आहेत. काेट्यवधींची सट्टेबाजी करणाऱ्यावर राज्यात थातूरमाथूर कारवाई केली जाते. काेट्यवधींची कमाई करणारे १०० रुपयांत तासांत पाेलिसांकडून सुटका करून घेतात. सट्टेबाजीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. यंदा पहिल्याच आठवड्यात दाेन धाडी पडल्या आहेत. आता जालना, आैरंगाबादेत छापे पडले.

यवतमाळचे 3 बुकी राज्यात चालवतात सट्टेबाजी
सट्टेबाजीचे सर्वात माेठे मार्केट गुजरातमध्ये आहे. त्यापाठाेपाठ महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये यवतमाळ शहर आघाडीवर आहे. या ठिकाणी सर्रासपणे सट्टेबाजीचे मार्केट आहे. येथील तीन बुकी हे अवघ्या महाराष्ट्रामध्ये सट्टेबाजीचे मार्केट चालवतात. त्याचे नागपूरसह आैरंगाबाद, अकाेला, अमरावती, पुणे, मंुबईसारख्या माेठ्या शहरांमध्ये तगडे नेटवर्क आहे. त्यामुळेच या तिघांच्या नेटवर्कने राज्यात काेट्यवधींचा ब्लॅक व्यवहार केला जाताे.

असा व्यवहार : सामन्यावरचा सट्टा फाेनवरून घेतला जाताे. एका ठिकाणावरून बुकी वा एजंट हा सामन्यावर सट्टा लावताे. त्यासाठी त्या सामन्याच्या स्थितीनुसार सट्टेबाजीचे दरही जाहीर केले जातात. यात ५० रुपयास १ हजार, तर कधी ५०० रुपयास १ हजार, १० हजार दिले जातात.

अशी देवाणघेवाण : सामन्यानंतर सट्टेबाजीत बाजी मारणाऱ्यांना एजंट वा बुकीकडून पैशाचे वाटप करण्यात येते. छाेट्या बँकेच्या माध्यमातूनही संबंधित ग्राहकांच्या खात्यावर पैसे टाकले जातात.

बाॅल टू बाॅल, विकेट, विजयावर सट्टा : चाहते हे बाॅल टू बाॅल, विकेट आणि संघाच्या विजयावर सट्टा लावतात. यात सर्वाधिक प्रमाणात सट्टा घेतला जाताे. पाच वा दहा षटकांपर्यंतच्या धावसंख्येचाही समावेश आहे.

हवाल्यावर काेट्यवधी रुपयांचा व्यवहार
सट्टेबाजीमध्ये हवाल्यावर काेट्यवधींचा व्यवहार केला जाताे. त्यामुळे संबंधित व्यक्तीकडून पैसे घेणे आणि त्याला देणे अधिक साेपे आहे. याशिवाय काेणत्याही प्रकारचा पाेलिस कारवाईचा धाेकाही नाही. अशा प्रकरणात हवाल्यातून व्यवहार करण्यासाठी विशेष व्यक्तीही सक्रिय आहे. त्यामुळेच या हवाल्याच्या व्यवहारामुळे सध्या राेख काेट्यवधी रुपये मार्केटमध्ये आहेत. यातून मार्केटमध्ये छुप्या मार्गाने हा पैसा बाहेर पडत आहे.

महाराष्ट्रात सट्टाबाजार सज्ज; पुणे, नागपूर, यवतमाळ, आैरंगाबाद, अकाेल्यासह पाच शहरांमध्ये ३० पेक्षा जास्त बुकी, आतापर्यंत १२ वर्षांत १५० पेक्षा अधिक धाडी; ठाेस कारवाईचा अद्याप अभाव

बंद घरात सट्टा त्यामुळे जुन्या कायद्यानुसार कारवाई
काय म्हणताे जुगार कायदा
: बंद घरात वा गाेडाऊनमध्ये एखादी शर्यत, लढतीतील विजयावर पैसे लावणाऱ्यावर मुंबई जुगार प्रतिबंध ४, ५ नुसार गुन्हा दाखल
जामीनपात्र गुन्हा, तत्काळ जामीन : व्यक्ती व संस्थेवरील हा गुन्हा जामीनपात्र. त्यामुळे तासांत जामीन मिळताे.
आराेपीला फायदा : कारवाई करण्यात आल्यानंतर संबंधित व्यक्तीला जामीन मिळताे. म्हणजे त्याचे हे सट्टेबाजीचे काम पुन्हा जाेमाने कार्यरत हाेते..
कारवाईचे स्वरूप : पाेलिस निरीक्षक वा त्यावरील पदाचे अधिकारी धाड टाकून कारवाई करू शकतात. यात अटक केली जाते.

लाइव्ह लाइन, बेटाकुलरचे अॅप; नेटचा माेबाइलमध्ये वापर
- काय म्हणताे आयटी अॅक्ट
: माेबाइलमध्ये इंटरनेटचा वापर अनधिकृत कृत्यासाठी केल्यास आयटी अॅक्ट ६, ७ नुसार कारवाई केली जाऊ शकते.
- अजामीनपात्र गुन्हा : आयटी अॅक्टनुसार संबंधित व्यक्ती व संस्थेवर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाताे.
- असा हाेईल फायदा : आयटी अॅक्टनुसार कारवाईने संबंधित व्यक्तीवर अजामीनपात्र गुुन्हा दाखल हाेईल. यातून गैरव्यवहाराच्या प्रकाराला सहज आळा घातला जाऊ शकेल.
- कारवाईचे स्वरूप : त्यामुळे सदर गुन्हा करणाऱ्यावर दाेन वर्षांच्या कारावासासारखी कडक कारवाई करता येईल.

दुबळेपणा : सट्टेबाजांना बळ; किरकाेळ कारवाईनंतरही पुन्हा सक्रिय
कमकुवत कायदा

सट्टेबाजी राेखण्यासाठी महाराष्ट्रात कडक कायदा नाही. त्यामुळेच या बहाद्दरांचे फावले आहे.आराेपींवर कलम ४, ५ नुसार कारवाई केली जाते. अटकेनंतर त्या आराेपींना तत्काळ जामीनही दिला जाताे. कमकुवत कायद्यामुळे आराेपींना धाक उरलेला नसल्याची खुद्द पाेलिस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया आहे.

फितूर साक्षीदार, आराेपी निर्दाेष
सट्टेबाजारातील आराेपींवर न्यायालयीन सुनावणीत काही साक्षीदा फितूर हाेतात. त्यामुळे खरे आराेपी हे निर्दाेष सुटतात. साक्षीदारांना आर्थिक प्रलाेभने दाखवली जातात.जप्त रक्कम परत घेण्याचा मार्ग माेकळा हाेताे. न्यायालयाकडे अर्ज करून हेच आराेपी ही रक्कम परत मिळवतात.

काय म्हणतात पाेलिस अधिकारी
सरकारी साक्षीदाराची गरज

सट्टेबाजी, जुगारसारख्या प्रकरणात आराेपींवर गुन्हा दाखल करताना सरकारी साक्षीदार असणे गरजेचे आहे. यातून या प्रकरणातील आराेपींच्या पळवाटांवर अंकुश ठेवता येईल. या प्रकरणात अशा सरकारी साक्षीदारांची मदत माेलाची ठरेल. तसेच खासगी साक्षीदारांना आर्थिक प्रलाेभने देऊन फितूर करण्याचे प्रकारही राेखता येतील.

आयटी अॅक्ट प्रबळ व्हावा
सट्टेबाजीदरम्यान माेठ्या प्रमाणात इलेक्ट्राॅनिक वस्तूंचा माेठ्या संख्येत वापर केला जाताे. मात्र, केवळ इंटरनेट न वापरल्यामुळे याप्रकरणी आयटी अॅक्ट लावता येत नाही. मात्र, यातील माेबाइलसारख्या वस्तूंच्या माध्यमातून दुबईसारख्या दुसऱ्या देशात सर्रासपणे सट्टेबाजी केली जाते. त्यासाठी आयटी अॅक्टमध्ये प्रबळता आणण्याची गरज आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser