आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे क्रिकेट स्पर्धा:इरफान पठाणचे शतक हुकले; मास्टर क्लबने जाधव इलेव्हनला हरवले

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्रीतील एचएसजे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या वनडे क्रिकेट स्पर्धेत मास्टर क्रिकेट क्लबने जाधव इलेव्हन संघावर 133 धावांनी मोठा विजय मिळवला. सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारा इरफान पठाण (97 धावा, 2 बळी) सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मास्टरने 36.2 षटकांत सर्वबाद 313 धावा उभारल्या. यात संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर कर्णधार अब्दुल रकिब आणि त्यानंतर आलेली श्रावणी खडके भोपळाही न फोडता तंबूत परतले. सलामीवीर इरफान पठाणने एकाकी लढत दिली. त्याने शतक अवघ्या 3 धावांनी हुकले. त्याने 49 चेंडूंत फटकेबाजी करत 9 चौकार व 9 उत्तुंग षटकारांची बरसात करत 97 धावा ठोकल्या.

रोहित शर्माने एन. राजपूतच्या हाती झेल बाद करत त्याचे शतकाचे स्वप्न भंग केले. अनिरुद्ध जोशीने 17 धावा जोडल्या. सोहेल शेख एक धावेवर परतला. संग्राम परिहारने 72 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार व 5 षटकार खेचत 87 धावांची अर्धशतकी खेळी केली. संकेत वैद्यने त्याचा त्रिफळा उडवला. मो. अलीने 41 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकारासह 28 धावा केल्या. अश्विन जाधव 4 धावा करु शकला. जाधवकडून संकेत वैद्यने 40 धावा देत 4 फलंदाज तंबूत पाठवले. रोहित शर्माने 2 गडी बाद केले. एन. राजपूत, संकेत जे. यांनी प्रत्येकी 1-1 गडी टिपला.

प्रत्युत्तरात जाधव इलेव्हन संघाचा डाव 28.2 षटकांत 180 धावांवर संपुष्टात आला. यात आदित्य शिंदे (0) आणि साहिल तडवी (5) या सलामीवीर जोडीसह कर्णधार महेश राठोड (2) संघाला चांगली सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरले. यष्टिरक्षक फलंदाज विवेक घुगेने 49 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकार खेचत 65 धावांची अर्धशतकी खेळी केली. संघाच्या पराभवामुळे त्याचे अर्धशतक व्यर्थ ठरले. निरजने 58 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 40 धावांचे योगदान दिले. विवेक व निरज जोडीने चौथ्या गड्यासाठी 101 धावांची शतकी भागीदारी केली. ओम दानवे शुन्यावर बाद झाला. संकेत जे. याने 24 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार मारत 30 धावा काढल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. मास्टरच्या मो. अलीने 3 आणि इरफान पठाण, प्रतिक गोमटे, अश्विन जाधव यांनी प्रत्येकी दोन-दाेन गडी बाद केले.

बातम्या आणखी आहेत...