आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेले जलविद्युत केंद्र सहा महिन्यांपासून तांत्रिक कारणाने बंद आहे. वीजनिर्मितीसाठीचा कालवा दोन वर्षांपूर्वी खचला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी पाटबंधारे विभाग व जलविद्युत केंद्र एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. यामुळे येथे वीजनिर्मिती आणखी वर्षभर तरी सुरू होणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जलविद्युत केंद्रातील (हायड्रो प्रोजेक्ट) वीजनिर्मिती दुरुस्तीच्या नावाखाली अनेक वेळा बंद राहत आहे. केंद्र सुरू करण्यास आणखी आठ महिने लागतील, असे अधिकारी सांगत आहेत. मात्र, हा तांत्रिक बिघाड दूर झाला तरीही यासाठी ज्या कालव्यातून पाणी सोडले जाते तो कालवा खचला असून त्यावरील पिचिंग जलविद्युत केंद्र करणार होते. ती दुरुस्ती आम्ही केली, इतर दुरुस्ती आता पाटबंधारे विभागाने करावी, असे अभियंता ए. एस. साेनी यांचे म्हणणे आहे. तर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव म्हणाले की, आम्ही या कालव्याचे गाइड पार्क करणार आहोत. मात्र, त्यासाठी आणखी सहा महिने किंवा वर्षभराचा कालावधी लागेल. त्यामुळे जलविद्युत केंद्रातून आणखी वर्षभर तरी वीजनिर्मिती होणार नाही असे स्पष्टपणे दिसत आहे.
पाणीपातळी १५२२ फूट १८ ऑगस्ट १९८७ रोजी हे १२ मेगावॅट क्षमतेचे जलविद्युत केंद्र (हायड्रो प्रोजेक्ट) सुरू करण्यात आले. ते येलदरी जलविद्युत केंद्रांतर्गत चालवले जाते. पूर्ण क्षमतेने वीजनिर्मितीसाठी जायकवाडी धरणाची किमान पाणीपातळी १५२२ फूट असणे आवश्यक आहे. वीजनिर्मितीसाठी नदीपात्रात रोज पाणी सोडून परत ओढावे लागते. यासाठी धरणाच्या मुख्य २७ दरवाजांलगत एक कालवा आहे. तोच दोन वर्षांपूर्वी खचल्याने आता यातून पाणी सोडले जात नाही. म्हणून वीजनिर्मिती ठप्प आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.