आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचनाचा प्रश्न कायम:जायकवाडीचे 60 टक्के कालवे नादुरुस्त, त्यामुळे 14 ची पाणी पाळी 30 दिवसांवर

प्रवीण ब्रह्मपूरकर | औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जायकवाडी धरणाचे ६० टक्क्यांपेक्षा अधिक कालवे खराब झालेले आहेत. त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. १४ दिवसांची पाणीपाळी ३० दिवसांवर गेली आहे. आता दुरुस्तीसाठी सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ सप्टेंबरच्या कार्यक्रमात कालवे दुरुस्तीची घोषणा केली हाेती. रब्बी हंगाम लवकरच सुरू होणार असल्यामुळे तात्पुरत्या दुरुस्तीसाठी मशिनरी कमी पडत आहे. त्यामुळे सीएमआयए तसेच इतर संघटनांकडून मशिनरी मिळवण्यासाठी कडा विभाग प्रयत्न करत आहे.

कालवे, चाऱ्या नादुरुस्त असल्याने पाण्याचा माेठ्या प्रमाणावर अपव्यय हाेत आहे. याबाबत कडाचे सहायक अधीक्षक अभियंता जे. एन. हिरे यांनी म्हणाले, एकूण कालवा वितरिका आणि चाऱ्यांची लांबी २३०० किमी आहे. आता चाऱ्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

पैठणपासून कालवा वितरिका आणि चाऱ्यांची लांबी २३०० किमी चाऱ्यांची अवस्था दयनीय पैठणच्या डाव्या कालव्याच्या चाऱ्यांची लांबी १३५० किमी तर उजव्याची लांबी ६३० किमी आहे. चाऱ्यांमध्ये बाभळीची झाडे वाढली आहेत. गाळही साचला आहे. सिमेंटचा स्लॅब उखडला आहे. जायकवाडीच्या १९८० किमीपैकी ६० टक्क्यांपेक्षाही अधिक चाऱ्या नादुरुस्त झाल्या आहेत.

जास्त दिवस द्यावे लागते पाणी कालव्याची वहनक्षमता घटल्यामुळे १४ ऐवजी ३० दिवस पाणी द्यावे लागते. डाव्या कालव्यातून वहन क्षमता ३६०० असताना १८०० आणि उजव्यातून २२०० म्हणजेच ९०० क्युसेक अशी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक घटली आहे. जी पाणी पाळी १४ दिवसांत देणे अपेक्षित असते त्यासाठी ३० दिवस लागतात.

कालव्यात वाढली मोठमोठी झाडे जायकवाडी धरणाच्या माध्यमातून १ लाख ८४ हजार हेक्टर जमिनीचे सिंचन केले जाते. पैठणचा डावा कालवा २०८ किमी तर उजवा कालवा १३२ किमी लांबीचा आहे. कालव्यात माेठमाेठी झाडे वाढल्याने दुरवस्था झाली आहे. पाणी वाया जात आहे.

धरणात पुरेसे पाणी असूनही शेतकऱ्यांना मिळणार नाही रब्बी हंगाम या महिन्यात सुरू होईल. त्यामुळे जलसंपदा विभागाने वेळेत दुरुस्ती न केल्यास अपेक्षित सिंचन होणार नाही. त्यामुळे धरणात पाणीसाठा शिल्लक राहील. पाणी असूनही शेतकऱ्यांना मिळणार नाही. - शंकरराव नागरे, जलतज्ज्ञ

गाळ काढणे, भराव रिकामा करण्यासाठी मशिनरीची गरज कालवा आणि चाऱ्याची दुरवस्था वाढली आहे. त्यामुळे सीएसआरच्या माध्यमातून मशिनरी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गाळ काढणे, भराव रिकामा करणे यासाठी मशिनरीची गरज आहे. - जे. एन. हिरे, सहायक अधीक्षक अभियंता

बातम्या आणखी आहेत...