आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्कृष्ट कामगिरी:आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल विद्यापीठ स्पर्धेसाठी ईश्वरी, प्रियंकाची निवड

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकाॅक (थायलंड) येथे १४ ते १७ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल विद्यापीठ स्पर्धेसाठी औरंगाबादच्या ईश्वरी शिंदे व प्रियंका सोळंके दोन खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. या दोघींनी आंतरविद्यापीठ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. ईश्वरी वयाच्या १३ व्या वर्षापासून सॉफ्टबॉल खेळते. या खेळाडूंना प्रशिक्षक गणेश बेटूदे, अक्षय बिरादार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या निवडीबद्दल संघटनेचे अध्यक्ष डॉ. दत्ता पाथ्रीकर, सचिव गोकुळ तांदळे, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ उदय डोंगरे, दीपक रुईकर, दिनेश वंजारे, सचिन बोर्डे, संतोष अवचार यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...