आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुस्लिम बांधवांचा चितेगाव येथे इस्तेमा सुरू असून यामध्ये आज सुमारे चार लाख भाविकांचा सहभाग आहे. त्यामुळे पैठण रोडवर इस्तेमासाठी जाणाऱ्यांची मोठी वर्दळ आहे. इस्तेमास्थळी एका व्यक्तीची प्रकृती बिघडली. त्यानंतर 12 मिनिटांतच इस्तेमास्थळी औरंगाबाद शहरातून रुग्णवाहीका पोहचली. विशेष म्हणजे या रुग्णवाहिकेला रस्ता करुन देण्यासाठी इस्तेमासाठी तैनात साथींनी मोठे सहकार्य केले. त्यामुळे रुग्णालाही वेळेवर उपचार मिळू शकले.
मुस्लिम बांधवांचा इस्तेमा चितेगाव येथे 10 डिसेंबरपासून सुरू आहे. आज रविवार असल्याने इस्तेमासाठी जाणाऱ्यांची मोठी वर्दळ पैठण रोडवर आहे. लोकाचे जत्थेच या मार्गावर असल्याने सामान्यतः वाहनाला वीस किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एक तासांपेक्षा अधिक वेळ लागत आहे.
साथींचे कार्य मदतीचे
या मार्गावर आज वाहतूक आणि गर्दी आहे. इस्तेमासाठी स्वंयसेवक या मार्गावर तसेच इस्तमास्थळी तैनात आहेत. कुणालाही अडचण येऊ नये. वाहतूक सुरळीत करण्यापासून ते भाविकांना मदत करण्यापर्यंत हे साथी कार्य करीत आहेत.
आज इस्तेमास्थळी एका व्यक्तीची प्रकृती बिघडली. यामुळे तेथून आपत्तकालीन रुग्णवाहिका (108) बोलावण्यात आली. परंतु एवढ्या गर्दीत रुग्णवाहिका येणार कशी हा प्रश्न सतावत होता. यावर इस्तेमातील साथींनी लगेचच तोडगा काढला.
रुग्णाला तातडीची मदत
औरंगाबादेतील रेल्वेस्थानक ते इस्तेमापर्यंत साधारणतः 18 ते 20 किलोमीटर अंतर आहे. हे अंतर विनाअडथळा पार करण्यासाठी चितेगावपासून ते रेल्वेस्थानकापर्यंत साथींनी गर्दीला सावरले. त्यानंतर रुग्णवाहीका अवघ्या 12 मिनिटांत इस्तेमास्थळी पोहचली व रुग्णाला उपचारासाठी अशाच पद्धतीने जलदरित्या नेण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.