आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागत आठवड्यातील दमट व उष्ण वातावरणाने उत्तरेतील अतिशीत वारे खेचून आणले आहे. परिणामी शुक्रवारी किमान तापमान ९.६, तर शनिवारी ९.१ अंश सेल्सियसवर म्हणजे सरासरीच्या तुलनेत ४ अंशांनी नीचांक पातळीवर जाण्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. आता २ दिवस थंडीचा कडाका कायम राहील, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
गत आठवड्यात कमी हवेचा दाब वाढल्याने किमान तापमान वाढले होते. थंडीचा कडाका कमी झाला होता. दमट उष्णतेमुळे पश्चिमी विक्षोभ व उत्तरेतील अतिशीत वारे खेचून आणण्यासाठी उपयुक्त ठरले. हवेचा वेग वाढून रात्रीचे तापमान वेगात कमी झाले. १ फेब्रुवारी रोजी १४.२ अंशांवर असलेले किमान तापमान गत दोन दिवसांपासून सरासरीपेक्षा चार अंशांपर्यंत घसरले आहे. अंग गोठवणारी थंडी दाखल झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.