आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्योतिष्यांकडून संभ्रम दूर:भद्राकाळातही राखी बांधणे शुभच ; 10.38 नंतर पौर्णिमेचा मुहूर्त सुरू

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवघ्या पाच दिवसांवर (११ ऑगस्ट) रक्षाबंधनाचा सण आलेला आहे. त्यासाठी विविध आकारांच्या, रंगांच्या राख्यांनी दुकाने सजली असून बहिणीला भेटवस्तू देण्यासाठीही बाजारपेठेत मोठी उलाढाल होऊ लागली आहे. मात्र याच दिवसावर भद्राकाळाचे सावट आल्याने हा दिवस अशुभ दिवस मानला जाताे. त्यामुळे म्हणजे येत्या गुरुवारी रक्षाबंधन सण साजरा करावा की नाही याबाबत संभ्रम आहे. मात्र ज्योतिष्य अभ्यासकांनी ही शंका दूर केली असून गुरुवारी १०.३८ वाजेनंतर दिवसभर रक्षाबंधनाचा सण साजरा करता येईल, असे शास्त्राच्या आधारे सांगितले.

११ जुलै रोजी श्रावण पोर्णिमा सकाळी १०.३८ वाजता सुरू होईल. ती १२ जुलै रोजी सकाळी ७.०५ वाजेपर्यंत आहे. मात्र गुरुवारी रात्री ८ वाजून ५३ मिनिटापर्यंत भ्रदाकाळाचे सावट आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या दिवशी भद्रा असते, तो दिवस अशुभ मानला जातो. त्यामुळे अनेकांनी शुक्रवारीच रक्षाबंधन साजरे करण्याची तयारीही केली आहे. मात्र यंदाच्या भद्राचा राखी पोर्णिमेवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे ज्योतिष्य अभ्यासकांचे म्हणणे आहे.

चंद्राच्या राशीनुसार शुभ अशुभ
मुहूर्त चिंतामणीनुसार, जेव्हा चंद्र कर्क, सिंह, कुंभ किंवा मीन राशीत असतो तेव्हा भद्रा पृथ्वीवर वास करते. जेव्हा चंद्र मेष, वृषभ, मिथुन किंवा वृश्चिक राशीत असतो तेव्हा भद्राचा निवास स्वर्गात राहतो. जेव्हा चंद्र कन्या, तूळ, धनु किंवा मकर राशीत असतो तेव्हा भद्रा अधोलोकात येते.

अधोलोकात भद्रा शुभ
भद्रा ज्या संसारात राहते ते जग प्रभावी राहते. अशाप्रकारे चंद्र कर्क, सिंह, कुंभ किंवा मीन राशीत असेल तरच त्याचा परिणाम पृथ्वीवर होईल, अन्यथा होणार नाही. जेव्हा भद्रा स्वर्गात किंवा अधोलोकात असेल तेव्हा ते शुभ आणि फलदायी असे म्हटले जाईल,
अशी माहिती ज्योतिषाचार्य मनिषा लाळे यांंनी दिली.

चंद्राचा मकर राशीत प्रवेश शुभ
गुरुवारी राखी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र मकर राशीत राहील. त्यामुळे भद्राचे वास्तव्य अधोलोकात राहील, त्यामुळे हा काळ अशुभ मानला जाणार नाही. म्हणजेच ११ जुलै रोजी सकाळी १०.३८ नंतर दिवसभर आपापल्या सोयीनुसार राखी बांधता येईल.

श्रवणामुळे सण साजरा करा
गुरुवारी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ असला तरी शुभ दिवसांसाठी लागणारा श्रवण नक्षत्र असल्याने या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकतो.
- मनीषा लाळे- कुलकर्णी, ज्योतिषाचार्य

बातम्या आणखी आहेत...