आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटकांसह हज यात्रेकरूंची सुविधा:इंडिगोच्या विमानामुळे एक दिवसात मुंबईला जाऊन परतणे सहज शक्य

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडिगोने हैदराबादनंतर मुंबईसाठी १ डिसेंबरपासून सायंकाळी ७.१० वाजता विमानसेवा सुरू केली. हे विमान रात्री ८.१० वाजता मुंबईला पोहोचणार आहे. सकाळी ७.०५ वाजता मुंबईसाठी इंडिगोची विमानसेवा असून एअर इंडियाचे सकाळी ८.०५ वाजता विमान आहे. इंडिगोचे सायंकाळी ५.४० वाजता मुंबईहून औरंगाबादसाठी विमान आहे. त्यामुळे औरंगाबादकरांना आता सकाळी मुंबईला जाऊन सायंकाळी परत येणे शक्य होणार आहे. विदेशातून रात्री आणि पहाटे मुंबईला येणारे पर्यटक, भारतीय नागरिक आणि हज यात्रेकरूंना सकाळ आणि सायंकाळी औरंगाबादला येण्यासाठी एक चांगला पर्याय इंडिगोच्या विमानामुळे मिळाला आहे.

ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ औरंगाबादसह विविध उद्योजकांच्या संघटना, सीएमआयए, औरंगाबाद फर्स्ट आदींनी मुंबईसाठी अतिरिक्त विमानसेवेची मागणी केली होती. दिवाळीनंतर मुंबई, दिल्ली आणि हैदराबादला जाणाऱ्या विमानांमध्ये मोठी गर्दी झाली. विमानसेवा संपूर्ण क्षमतेसह सुरू झाली. मुंबईला केवळ सकाळच्या सत्रामध्ये एअर इंडिया आणि इंडिगोचे विमान सुरू हाेते. इंडिगोने ३० ऑक्टोबर ते २८ मार्च २०२३ साठी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यात हैदराबादसाठी सकाळ आणि दुपारच्या सत्रात विमानसेवा सुरू आहे. दिल्लीला एअर इंडियाचे सकाळी, तर इंडिगोची विमानसेवा सायंकाळच्या सत्रात आहे. िवमाने हाऊसफुल्ल : विदेशी पर्यटक, भारतामधील विदेशात गेलेले नागरिक, हज यात्रेकरू मुंबईला पहाटे अथवा रात्री आले तर त्यांना सकाळी व सायंकाळी औरंगाबादला येणे शक्य आहे. ३० ऑक्टोबरपासून दिल्ली, हैदराबाद, मुंबईला जाणारी विमाने हाऊसफुल्ल आहेत.

बातम्या आणखी आहेत...