आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवर्धन:प्राचीन बारवांचे संवर्धन होणे महत्त्वाचे : सुनील केंद्रेकर

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन काळात बांधलेल्या बारवा व त्यांचे स्थापत्यशास्त्र आजच्या काळात लोप पावत चालले आहे. त्यामुळे या प्राचीन बारवा, मंदिरे यांची जपवणूक केली पाहिजे. बारवांना ऐतिहासिक महत्त्व असून त्याचे संवर्धन केले तर पुढच्या पिढीला त्याची माहिती होईल. मानवतच्या युवकांनी ४० दिवस मेहनत घेत बारवांची स्वच्छता आणि गाळ काढण्याचे केलेले काम नक्कीच प्रेरणादायी असल्याचे सांगत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी त्यांच्या कामाचे काैतुक केले. केंद्रेकर यांनी परभणी जिल्ह्यातील मानवत, वालूर आणि हतनूर येथील बारवांची पाहणी केली.

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते बारव परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी जि.प. सीईओ शिवानंद टाकसाळे, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार सारंग चव्हाण, न.प. मुख्याधिकारी जयंत सोनवणे, बारव संवर्धन समितीचे मल्हारीकांत देशमुख आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...