आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय कर परिषद:व्यवसाय सुरू करण्यापूर्वी करप्रणाली समजून घेणे गरजेचे ; नरेश सेठ यांनी केले आवाहन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या उत्पन्नात करांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यातील गुुंतागुंती समजून घ्याव्यात व करांचा नियमित भरणा करावा, असे प्रतिपादन सीए नरेश सेठ यांनी शनिवारी केले. अप्रत्यक्ष कराविषयी आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.

आयसीएच्या औरंगाबाद, नगर, धुळे, जळगाव, पिंपरी-चिंचवड, लातूर, नांदेड, सोलापूर जिल्ह्यांची जीएसटी आणि आयसीएआयच्या अप्रत्यक्ष कर समितीने ही परिषद आयोजित केली होती. बीड बायपास येथील आयसीएआय भवनात शनिवारी परिषदेचे उद्घाटन व विविध विषयांवर चर्चासत्र पार पडले. करप्रणालीतील मूलभूत गोष्टी कशा समजून घ्याव्यात, त्यातील गुंतागुतीवर कशी मात करावी याबाबत मार्गदर्शन करताना सेठ म्हणाले, ‘डेव्हलपर, ओनर आणि कस्टमर हे तिन्ही घटक लक्षात घेणे गरजेचे आहे. ५ ते १८ टक्के दराने आकारल्या जाणाऱ्या जीएसटीबाबतची माहिती आधी घेऊन नंतरच उद्योग, व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घ्यावा.

त्यामुळे पुढे कमी समस्या उद्भवतील. करांतून मिळणाऱ्या महसुलावरच विकासाचा डोलारा चालतो. सेवा-सुविधा मिळतात. त्यामुळे कराचा नियमित भरणा करावा. नोटीस आली तरी घाबरण्याचे काही कारण नाही. नोटिसीत काय म्हटले आहे हे आधी जाणून घ्यावे आणि उत्तर द्यावे.’ नोटिसीला उत्तर कसे द्यायचे याचे मार्गदर्शनही त्यांनी केले. डेव्हलपमेंट मॅनेजमेंट काँट्रॅक्ट मॉडेलबाबतही सेठ यांनी माहिती दिली. अॅड. भरत रायचंदानी यांनी जीएसटीसंदर्भात येणाऱ्या अडचणी व त्यावर मात कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. योगेश अग्रवाल, राहुल आंचलिया तसेच सीए, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...