आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्युत्तर:इको झोनमुळे जायकवाडीला सौरऊर्जा प्रकल्प होणे अशक्य, माजी मंत्री पटेल यांचे डाॅ. कराडांना प्रत्युत्तर

पैठणएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जायकवाडी जलाशयात एक हजार मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाची योजना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी जाहीर केली. मात्र, जायकवाडी हा इको सेन्सिटिव्ह झोन (पक्षी अभयारण्य) असल्याने येथे हा प्रकल्प होणे अशक्य असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी मंत्री अनिल पटेल यांनी सांगितले.

ते म्हणाले की, मी मंत्री असताना जायकवाडीवर बोटविहार, नदीपात्रात पर्यटन वाढीसाठी नियोजन केले होते. इको झोनमुळे ते होऊ शकले नव्हते. डॉ. कराड केवळ पंकजा मुंडेंना डावलण्यासाठी नामधारी केंद्रीय मंत्री झाले. औरंगाबादासाठी काय केले ते न सांगता उगाच अशक्यप्राय प्रकल्पांच्या घोषणा करत आहेत. त्यांच्यात ताकद असेल तर त्यांनी खरेच हा प्रकल्प आणून दाखवावा.

बातम्या आणखी आहेत...