आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या (एनईपी) अंमलबजावणीसाठी प्राध्यापकांची मानसिकता सकारात्मक पद्धतीने बदलावी लागणार आहे. शिक्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या विद्यार्थ्यांनी या धोरणाचा आग्रह धरला पाहिजे, असे मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम क्षेत्राचे संघटनमंत्री देवदत्त जोशी यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (अभाविप) ‘संकल्प २.० युवा नेतृत्व’ या जिल्हास्तरीय विद्यार्थी संमेलनात ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ अध्यक्षस्थानी होते. उद्योजक रामचंद्र भोगले यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. संमेलनाचे उद्घाटन व्याख्याते विठ्ठल कांगणे, जिल्हा संयोजक उमाकांत पांचाळ, महानगराध्यक्षा डॉ. योगिता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजून घेणे गरजेचे असल्याचे उद्योजक राम भोगले यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे आधार बनावे, विद्यार्थ्यांनी आलेल्या परिस्थितीशी संघर्ष करून ध्येय प्राप्त करावे. समाजामध्ये राहत असताना संस्कार जपून आईवडिलांचे नाव मोठे करण्यासाठी कार्य करावे, असे व्याख्याते कांगणे म्हणाले.एनईपी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, तसेच अभाविपच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशभरात जिल्हास्तरीय विद्यार्थी संमेलन घेण्यात येत असल्याचे पांचाळ यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप प्र- कुलगुरू डॉ. शिरसाठ यांनी केला. शिवशंकर शेरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. योगिता पाटील यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.