आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​वर्धापन दिन सोहळा:कौशल्य आधारित मनुष्यबळ तयार होणे गरजेचे: छत्रपती संभाजीराजे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे परराज्यांतील मनुष्यबळावर विसंबून राहावे लागत आहे. बेरोजगारीचा प्रश्न आपल्याकडे गंभीर बनला आहे. यावर मात करण्यासाठी कौशल्यावर आधारित मनुष्यबळ निर्मिती करणे नितांत गरजेचे झाले आहे, असे प्रतिपादन छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी केले.मोरया असोसिएट्सचा वर्धापन दिन व मोरया गणेश फाउंडेशन समारंभाचे उद्घाटन शनिवारी छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार हरिभाऊ बागडे, प्रसिद्ध वक्ते प्रदीप सोळुंके, राजू शिंदे, संस्थापक अध्यक्ष गणेश मानकुसकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आणि महिलांचा सत्कार करण्यात आला.

सामाजिक दायित्व पूर्ण करण्यासाठी ज्यांची पोटं भरलेली आहेत त्यांनी रिकामं पोट असलेल्यांचा विचार केला पाहिजे. सामाजिक दरी भरून काढण्यासाठी प्रत्येकाने पाऊल उचलण्याची गरज आहे. आत्मभान ठेवून सर्वांनी काम करण्याचे आवाहन प्रास्ताविकात प्रदीप सोळुंके यांनी केले. आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले की, ज्यांच्याकडे कौशल्य त्यांनाच नोकरी मिळेल, अन्यथा उच्च शिक्षण घेऊनही काहीच उपयोग होणार नाही. हर्षवर्धन कराड म्हणाले की, शिक्षण प्रशिक्षण आणि सशक्तीकरण काळाची गरज आहे. यातच आपण मागे राहिलो आहोत. शिक्षण घेतल्यानंतर कोणत्या क्षेत्रात आपण काम करणे गरजेचे आहे. त्यासाठीचे मार्गदर्शन मिळाले तर त्याचा विनियोग होईल.

शिस्तबद्ध गुण आत्मसात करण्यासारखा
बागडे यांचं वय बघा. या वयातही ते गर्दीतही धक्काबुक्की खात शिस्तबद्ध पद्धतीने वागतात. त्यांचा हा आदर्श गुण मला आत्मसात करावासा वाटतो, असे छत्रपती युवराज संभाजीराजे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...