आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखो रुपये लंपास:मित्रानेच रोख 5 लाखांसह कार लांबवल्याचा संशय

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वत:च्या नावाने लोन होत नसल्याने मित्राच्या नावाने कार लोन केले. नंतर कारचे उर्वरित दीड लाख रुपये देणे बाकी असल्याने मित्रानेच कार व त्यात ठेवलेले रोख ५ लाख रुपये लंपास केले. याप्रकरणी श्रीकांत निवृत्ती हिवराळे (४०, रा. ब्रिजवाडी, एमआयडीसी, चिकलठाणा) यांनी चिकलठाणा पोलिस ठाण्यात २ जानेवारी रोजी तक्रार दिली.

हिवराळे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. २०२१ मध्ये हिवराळे यांच्या नावावर कार लोन होत नसल्याने मित्र शेख फिरोज शेख अय्युब (रा. अल हिलाल कॉलनी, औरंगाबाद) याच्या नावावर १३ लाखांचे लोन करून कार खरेदी केली होती. दरम्यान, २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता एका जमीन विक्रीतून मिळालेले रोख ५ लाख कारमध्ये ठेवून हिवराळे मित्राला भेटण्यासाठी एका हॉटेलवर गेले. परत आल्यानंतर त्यांना कार दिसली नाही. त्यांनी सीसीटीव्ही तपासले असता, तोंडाला रुमाल बांधून आलेल्या अनोळखी दाेघांनी कार लांबवल्याचे समाेर आले. कारच्या व्यवहारातील दीड लाख रुपये देणे बाकी असल्याने स्वत:कडे एक चावी असणाऱ्या शेख फिरोजने केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...