आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सल्ला:बटण दाबून नेता जन्माला घालणारी जनताच दोषी ; राजकीय परिस्थितीवर जैनाचार्यांचे भाष्य

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजचे राजकारण बदलले आहे, तत्त्व आणि धर्म यांना सोडून राजकारण केले जात आहे. राजकारण जेव्हा तत्त्वाला सोडून चालते तेव्हा ते भरकटत जाते. अन्न, वस्त्र आणि निवारा याच माणसाच्या प्रमुख गरजा आहेत. यांच्यानंतर जात आणि धर्म येतो. आज लोक संप्रदायवादी झाले आहेत. त्यामुळे नेत्यांच्या वागण्याला दोष देण्यात अर्थ नाही. नेता बटण दाबल्याने जन्माला येतो. त्यामुळे त्यासाठी जनता दोषी आहे, असे अतिशय स्पष्ट, निर्भीड विचार जैनाचार्य पुलकसागर महाराज यांनी मांडले.

चार्तुमासानिमित्त आयोजित ज्ञानगंगा महोत्सवाची माहिती देण्यासाठी राजाबाजार येथील खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राजकारण, समाजकारणावरही भाष्य केले. ९ ते २१ ऑगस्ट दरम्यान हिराचंद कासलीवाल प्रांगणात सकाळी ८.३० ते ९.३० वाजेदरम्यान महाराज मार्गदर्शन करतील. महाराज म्हणाले, प्रवचन शृंखलेत मी नवीन सांगणार नाही. जे आपल्याकडेच आहे त्याची आठवण करून देणार आहे. लोक मंदिर, मशिदीचा जीर्णोद्धार करतात. मी संस्कृतीचा जीर्णोद्धार करण्यासाठी आलेलो आहे. वैचारिक क्रांती, परिवर्तन, प्रेरणा देणारा हा महोत्सव आहे. महोत्सवात राष्ट्रीय, सामाजिक, कौटुंबिक सुधारणेबाबत चर्चा होईल. माझ्या मते रोटी, कपडा, मकान या खऱ्या समस्या नाहीत. नैतिकता हे खरे आव्हान आहे. देव सगळ्यांना व्हायचे आहे. मात्र, त्याआधी मनुष्य बनण्याची क्रिया सुरू होते. या महोत्सवामुळे मनुष्य बनण्याची प्रक्रिया होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

समाज जातीयवादी झाला
आजचा समाज धर्माला सोडून आचरण करतो. समाजात घडणाऱ्या घटना नैतिकता ढासळल्याचे प्रतीक आहेत. नेत्यांना दोष देण्यात अर्थ नाही. जनतेने स्वत:चे चिंतन करून स्वत:मध्ये बदल करणे गरजेचे आहे, असेही महाराज म्हणाले. या वेळी महावीर पाटणी, ललित पाटणी, प्रकाश अजमेरा, विनोद लोहाडे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...