आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:आम्हाला चर्चेसाठी न बोलावणे औरंगाबादच्या जनतेवर अन्यायच; खासदार इम्तियाज जलील यांची पंतप्रधान माेदींवर टीका

औरंगाबाद3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कोरोनासारखा जीवघेणा आजार पसरत असताना त्यातही राजकारण केले जाते ही दुर्दैवी बाब आहे, असेही जलील म्हणाले

ज्या पक्षाचे पाचपेक्षा कमी खासदार आहेत त्यांच्यासोबत पंतप्रधानांनी चर्चा करणे टाळणे म्हणजे त्या-त्या भागातील जनतेवर अन्याय करण्यासारखे आहे. आम्हीच नाही तर असे अनेक पक्ष आहेत ज्यांचे पाचपेक्षा कमी खासदार निवडून आले आहे. याचा अर्थ त्या भागातल्या अडचणी पंतप्रधानांना महत्त्वपूर्ण वाटत नाही का, असा सवाल खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी केला आहे. कोरोनासारखा जीवघेणा आजार पसरत असताना त्यातही राजकारण केले जाते ही दुर्दैवी बाब आहे. असे करून पंतप्रधानांनी औरंगाबाद जिल्ह्यातील लाखो लोकांवर अन्याय केल्याचेही ते म्हणाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता देशातील सर्व मोठ्या पक्षांच्या गटनेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चेचे आयोजन केले आहे. ही चर्चा सकाळी ११ वाजता होणार असून यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विचारविनिमय होणार आहे. तसेच खासदारांकडून सूचना व अभिप्रायसुद्धा घेतले जाणार आहेत. 

...तर दुपारी चर्चा करा

आमचे नेते बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांची मागणी आहे की, इतर छोट्या पक्षाच्या नेत्यांसोबत दुपारी चर्चा करा किंवा एक-दोन दिवसात करा, पण याला ते कितपत प्रतिसाद देतील हे सांगता येत नाही. त्यामुळे ज्यांचे कमी खासदार आहेत, त्यांच्या मतदारसंघातील कोरोनाबाबतच्या समस्यांवर चर्चा न केल्याने या लोकांवर अन्याय होईल, असेही जलील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...