आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात गेल्या वर्षभरात फक्त ५०० कोटींची गुंतवणूक झाल्याचे व फक्त ४,५९१ जणांना रोजगार मिळाल्याचे सरकारी आकडेवारीतूनच सिद्ध होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालात ‘ऑरिक’साठी शासनाने ७,९४७ कोटींची तरतूद केली असून गेल्या वर्षभरात ६ हजार कोटींची गुंतवणूक झाल्याचा दावा केला आहे. त्यातून शेंद्रा एमआयडीसीत ८३९ आणि बिडकीन एमआयडीसीत १००६ भूखंड विकसित केल्याचा शासनाचा दावा असला तरी त्याआधीच्या आर्थिक पाहणी अहवालातही हे आकडे तसेच आहेत.
गेल्या पाच वर्षांतील आर्थिक पाहणी अहवालांचा तौलनिक अभ्यास केला असता ऑरिकमधील गुंतवणूक फक्त ५,५०० कोटींनी वाढल्याचे व रोजगार निर्मिती ८ हजारांनी वाढल्याचे दिसते. १५ वर्षांत ऑरिकमध्ये ३ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे. गेल्या पाच वर्षातील सरासरीनुसार वर्षाला फक्त १६०० रोजगारनिर्मिती होत आहे. असेच काम चालल्यास १५ वर्षांत ३ लाख रोजगारनिर्मितीसाठी उद्दिष्टपूर्तीस प्रत्यक्षात १८५ वर्षे लागतील!
ऑरिक अॅक्शन प्लॅनची गरज ही आहेत कारणे : फोकस्ड इंटरव्हेन्शनचा आभाव {शेजारील राज्यांच्या उद्योगपूरक धोरणांमुळे वाढती इंटरस्टेट स्पर्धा {मुंबईभोवतीच्या जिल्ह्यांची वाढती अनुकूलता व त्यातून वाढलेली स्पर्धा
हे आहेत उपाय : त्यासाठी लोकेशनच्या मार्केटिंगसाठी प्रभावी एजन्सीची नेमणूक {स्थानिक उद्योजकांना, लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन {अधिक व्हेंडर्ससह येणाऱ्या उद्योगांना प्राधान्य देण्याची गरज
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.