आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादची प्रसिद्ध ‘यूट्यूबर’ इटारसीला सापडली:रागात सोडले होते शहर; 'बिनधास्त काव्याला' 45 लाख फॉलोअर्स

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूट्यूबवर तब्बल ४५ लाख (४.५ मिलियन) फॉलोअर्स असलेली, सोशल मीडियावर अल्पावधीत प्रकाशझोतात आलेली औरंगाबादची १६ वर्षीय तरुणी सारा (नाव बदलले आहे) शुक्रवारी अचानक घरातून बेपत्ता झाली. तिच्या पालकांनीच सोशल मीडियावर तसे जाहीर केले अन‌् फॉलोअर्समध्ये एकच खळबळ उडाली.

औरंगाबादचे पोलिस मोबाइल लोकेशनवरून तिचा शोध घेत होते. सारा मनमाड रेल्वेस्थानकावरून निघाल्याचे कळताच पुढच्या सात तासांमध्ये तीन जंक्शनवरील रेल्वे पोलिसांना अलर्ट करण्यात आले. अखेर इटारसीमध्ये रेल्वे थांबवून तिचा शोध घेण्यात यश आले. मुलगी सापडत नसल्याने आधी तिच्या वडिलांनी ‘पोलिस मदत करत नाहीत’ असे सोशल मीडियावर लिहिले. पण मुलगी सापडल्यानंतर मात्र ‘पोलिसांनी खूप सहकार्य केले, मी त्यांचे आभार मानतो’ अशी कबुली त्यांनी दिली.

सारा ९ सप्टेंबर रोजी अचानक बेपत्ता झाली. गणपती विसर्जनाच्या दिवशी दुपारी १.३० वाजता ती घराबाहेर पडली. पण सायंकाळ होऊन गेली तरी परतली नाही म्हणून कुटुंब घाबरून गेले. तिचा मोबाइलही बंद होता. त्यामुळे घाबरलेल्या आईवडिलांनी छावणी पोलिसांत धाव घेतली. ही मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सारा बेपत्ता झाल्याची माहिती ठाण्याला प्राप्त झाल्यानंतर रात्री १० वाजता वरिष्ठांना त्वरित कळवले. सोशल मीडियावर सारा प्रसिद्ध असल्याने या प्रकरणाची जास्तच चर्चा होईल याची कल्पना पोलिसांना आली होती. त्यांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली गेली. छावणी पोलिस निरीक्षक शरद इंगळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सायबरचे निरीक्षक गौतम पातारे यांचे पथक कामाला लागले. रात्री ११.३० वाजता उपनिरीक्षक पांडुरंग डाके सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यासाठी आयुक्तालयात दाखल झाले.

रेल्वे पोलिसांची मोठी मदत

पोलिसांनी तांत्रिक तपास केला तेव्हा सारा पहाटे मनमाडवरून खुशीनगर रेल्वेत बसल्याचे स्पष्ट झाले. पाेलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी रेल्वे प्राेटेक्शन फोर्स, राज्य रेल्वे पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधला.

मनमाड, भुसावळ व खांडव्याचे रेल्वे पोलिस कामाला लागले. रेल्वेतील जवानांना छायाचित्र पाठवून तपास सुरू झाला. तेव्हा साराचे लोकेशन खांडवाच्या पुढे असल्याचे जवानांनी औरंगाबाद पोलिसांना कळवले. रेल्वेत तिने विरोध करू नये म्हणून रेल्वे इटारसीपर्यंत पोहोचू देण्यात आली. त्यानंतर तत्काळ तिला ताब्यात घेतले. आले. सायंकाळी छावणी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पांडुरंग डाके, तीचे पालक त्या दिशेने रवाना झाले.

यूट्यूबवरील मित्राला भेटण्यासाठी निघाली

सारा मागील वर्षभरात यूट्यूबवर प्रसिद्धीच्या झोतात आली. तिच्या जवळपास सर्व व्हिडिओला ५ ते ४५ मिलियन व्ह्यूजमध्ये प्रतिसाद मिळतो. साडेचार मिलियन सबस्क्रायबर असलेली सारा वडिलांसोबतच्या व्हिडिओमुळे जास्त प्रसिद्ध झाली. पण यूट्यूबर असलेल्या मित्राला भेटण्यासाठी ती जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सारा बेपत्ता झाल्याचे शनिवारी तिच्या आईवडिलांनी तिच्या अकाउंटवरून लाइव्ह येत सांगितले. लाइट बंद केल्यानंतर अंधारालादेखील घाबरणारी सारा एकटी राहूच शकत नाही, असे तिच्या आईने सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...