आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश प्रक्रिया:आयटीआय ; ६२ % प्रवेश, चौथी फेरी २७ ऑगस्टपर्यंत

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयटीआय प्रवेश प्रक्रियेत गुरुवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात ६२.५० टक्के प्रवेश निश्चित झाले. सध्या चौथी प्रवेश फेरी सुरू असून ही फेरी २७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. औरंगाबाद आयटीआयमध्ये एकूण ११०४ प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी आतापर्यंत ६९० जणांनी प्रवेश निश्चित केले आहेत. शनिवारपर्यंत मोठ्या प्रमाणात उर्वरित जागांवरही प्रवेश निश्चित होतील.

या वर्षी शंभर टक्के जागा भरल्या जातील असे आयटीआयमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. दहावीनंतर कमी खर्चात आणि कमी कालावधीत होणारा आयटीआय हा अभ्यासक्रम आहे. शिवाय रोजगारासह स्वयंरोजगाराची संधी असल्याने मोठ्या प्रमाणात शहरी असो वा ग्रामीण भागातील पालक आणि विद्यार्थी हेे आयटीआयला पसंती दर्शवतात. यंदा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणीला प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचाही आता या अभ्यासक्रमाकडे कल वाढत असल्याचे दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...