आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळापत्रक:आयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात पुन्हा बदल; 21 ऐवजी आता 31 ऑगस्टपर्यंत करता येईल अर्ज नोंदणी

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)च्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. परंतु येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला असून, तिसऱ्यांदा वेळापत्रकात बदल केले आहे. या बदलानुसार आता २१ ऑगस्ट ऐवजी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत. अशी माहिती आयटीआयच्या वतीने दण्यात आली आहे.

शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी हे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने आयटीआय अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास प्रधान्य देतात. १ ऑगस्टपासून यासाठीची प्रवेश नोंदणी सुरु झाली होती. यापुर्वी १४ ऑगस्ट त्यानंतर २१ ऑगस्ट अशी दोन वेळा विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती. परंतु येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता कोरोनाच्या काळात कोणीताही विद्यार्थी कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी पुन्हा ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच आयटीआय प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना सर्व माहिती उपलब्ध व्हावी यासाठी प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे. असेही आयटीआयमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाईलवरुन प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा

दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अर्ज करताना मोठ्या तांत्रिक अडचणींचा समाना करावा लागतो. या भागात राहाणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी शहरी भागाकडे धाव घ्यावी लागते. कोरोनच्या काळात या विद्यार्थ्यांची धावपळ होवू नये, म्हणून मोबाईलद्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दुर्गम व ग्रामिण भागास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कर्मचारी भेट देऊन लॅपटॉपव्दारे इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेत आहेत. तसेच ज्या भागातून कमी अर्ज प्राप्त झाले आहेत त्या भागात प्रवेश अर्ज भरण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मराठवाडा विभागातील शासकीय ८२ आणि खाजगी पन्नास आयटीआय मिळून अशा एकूण १३२ आयटीआयमध्ये १९ हजार २४४ जागा भरल्या जाणार आहेत.

अशी आहे आकडेवारी -

- मराठाडयात शासकीय संस्था - ८५ - प्रवेश क्षमता - १५,१३६

- खासगी संस्था - ५० - प्रवेश क्षमता - ४६८८

बातम्या आणखी आहेत...