आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:आयटीआयच्या परीक्षा ऑनलाइन, मात्र प्रात्यक्षिकांसाठी अडचणी

औरंगाबाद10 महिन्यांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

देशातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलाही (आयटीआय) कोरोनाची झळ बसली आहे. जुलै किंवा ऑगस्टमध्ये होणारी परीक्षा कोरोनामुळे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. परीक्षा कधी होतील याबाबत संभ्रम असला तरी यंदा या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे औरंगाबाद येथील आटीआयचे प्राचार्य अभिजित आल्टे यांनी दिव्य मराठीशी बोलतांना सांगितले. याची तयारी आम्ही सुरु केली असून, ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या मॉक टेस्ट  सुरू करण्यात आला आहेत असेही आल्टे म्हणाले.

कमी अवधी मध्ये प्रशिक्षण पूर्ण आणि कमी खर्चाचा अभ्यासक्रम शिवाय रोजगार आणि स्वयंरोजकाराची सुविधा उपलब्ध असल्याने शहरासह ग्रामीण भागात आयटीआयला महत्व आहे. गेल्या तीन महिन्यांपासून आयटीआयमध्ये ऑनलाइनद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. त्यामुळे जवळपास सर्वच अभ्यासक्रम शिकवण्याचा पूर्ण झाला आहे. विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण झाला असला तरी प्रॅक्टिकल करण्यास मोठी अडचण येत आहे. प्रॅक्टिकल घेण्यासाठी नियोजन सुरू आहे. आयटीआयची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय स्तरावरून ऑनलाइन पद्धतीने होते. परीक्षा देखील एकाचवेळी घेतल्या जातात. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयटीआयच्या परीक्षा कधी घ्याव्यात याबाबत केंद्र स्तरावर विविध पर्यायांबाबत विचार सुरू आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची माहिती, फोटोसह परीक्षेचा अर्ज ऑनलाइन भरला जातो. त्याची प्रक्रिया मे-जून महिन्यात होते. कोरोनामुळे ही प्रक्रिया अद्याप रखडलेली आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रासाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ओळखपत्राला विलंब लागत असल्याचे  आल्टे यांनी सांगितले.

दहावीच्या निकालाची प्रतिक्षा, प्रवेश प्रक्रिया रखडली

जूनमधील दहावीच्या निकालानंतर अकरावी व आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू होते; मात्र यंदा कोरोनामुळे दहावीचा निकाल रखडला आहे. जुलैच्या शेवटी दहावी, बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयटीआयची प्रवेशप्रक्रिया ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे.

विविध क्षेत्रांप्रमाणेच शिक्षण क्षेत्रावर आणि विविध अभ्यासक्रमांवरही कोरोनाचा प्रभाव पडला आहे. यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. या उद्देशाने विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यास घेण्यात आला. तो  जवळपास संपत आला आहे. प्रॅक्टिकल घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. परीक्षांबाबत अद्याप सूचना नाहीत; पण ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे. -प्राचार्य अभिजित आल्टे आयटीआय

बातम्या आणखी आहेत...