आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आयटीआय’मध्ये होणार कौशल्य विद्यापीठाचे उपकेंद्र:पदवी अभ्यासक्रम सुरू होणार; कौशल्य विद्यापीठ कुलगुरुंनी केली पाहणी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) परिसरात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे उपकेंद्र जुलै-2023 पर्यंत सुरू करण्यात येईल. अशी घोषणा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी केली आहे. मंगळवारी (२० डिसेंबर) त्यांनी आयटीआयची पाहणी केली. उद्योजकांशी केलेल्या चर्चेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे.

त्या म्हणाल्या, ‘उद्योजकांच्या मागणीनुसार रोजगारक्षम शिक्षण देऊन आवश्यक मनुष्यबळ निर्मितीसाठी कौशल्य विद्यापीठाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, बिझनेस इंटेलिजन्स, इन्नोव्हेशन अँड रोबोटिक्स अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. अभ्यासक्रमात ४० टक्के थिअरी आणि ६० टक्के 'ऑन जॉब ट्रेनिंग' देण्यात येणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर उत्तम प्रशिक्षित व अनुभवसिद्ध मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. केवळ यांत्रिकच नव्हे, तर संगणकीय अणि इतर कौशल्यांचे मिश्रण असलेल्या मेकॅट्रॉनिक्स शाखेतील कुशल मनुष्यबळाची गरज औरंगाबाद शहराला आहे. कौशल्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून असे मनुष्यबळ उपलब्ध होईल. इन्नोव्हेशन हबद्वारे संशोधनाला चालना मिळेल. उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन नव्या कौशल्यांचा शोध घेणे, जागतिक पातळीवरील आधुनिक तंत्रज्ञानाचा वेध घेणे, त्यानुसार कौशल्य प्रशिक्षणाची व्यवस्था करणे आदी कौशल्य विद्यापीठापुढे आव्हाने असणार आहे. त्यानुसार नव्या अभ्यासक्रमांची रचना, विद्यापीठासाठी आवश्यक मनुष्यबळाची भरती प्रक्रिया वेगाने केली जाणार आहे. त्यासाठी पुढील दोन ते तीन महिन्यात जाहिरात प्रकाशित केली जाईल. जुलै-2023 पर्यंत उपकेंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी म्हटले.

..

सहा महिन्यांत सुरू होईल उपकेंद्र-

..

उपकेंद्रात सहा ते आठ महिन्यांत उपकेंद्र कार्यरत करण्यात येईल. जून, जुलैमध्ये सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या उपकेंद्रातून विद्यार्थ्यांसाठी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यााच मार्ग मोकळा होणार आहे. पालकर यांनी घेतलेल्या बैठकीला सहसंचालक एस. आर. सूर्यवंशी, मॅजिकचे आशिष गर्दे, उपसंचालक अभिजित आल्टे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त सुरेश वराडे, अर्जून गायकवाड, उपप्राचार्य दिलीप वानखेडे आदींची उपस्थिती होती.

..

बातम्या आणखी आहेत...