आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफुलंब्रीच्या पाल येथील एचएसजे स्टेडियमवर सुरू असलेल्या वनडे क्रिकेट स्पर्धेत जाधव इलेव्हन संघाने जय हिंद संघावर २ गडी राखून मात केली. या लढतीत शतकवीर सोनू काटकर सामनावीर ठरला. प्रथम खेळताना जय हिंद संघाने ४३.५ षटकांत सर्वबाद २८३ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात जाधव इलेव्हन संघाने ३६ षटकांत ८ गडी गमावत २८६ धावा करत विजय साकारला.
रितेश वाहुळकरने ४१ धावा काढल्या. त्यानंतर आलेल्या सोनू काटकरने ८७ चेंडूंत १६ चौकार व ६ उत्तुंग षटकार खेचत नाबाद १३१ धावांची विजयी खेळी केली. अंकुश पचहरणेने ४२ धावा ठोकल्या. जय हिंदकडून नयन वाणीने ३ गडी बाद केले. तत्पूर्वी, जय हिंदकडून झैद खानने १२, हर्ष मुळेने २१, रोहन पंडितने २८ धावा केल्या. दर्श पांडेने ६२ चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांसह ९५ धावा ठोकल्या. आकाश पाचहारणेने ४, यशराज पवारने ३ व महेश राठोडने २ गडी बाद केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.