आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसबीसी क्रिकेट स्पर्धा:जाधव इलेव्हन संघाची युनिव्हर्सलवर मात, आर्यन चौधरी ठरला पुरस्काराचा मानकरी

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री तालुक्यातील पाल येथील एचएसजे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या एसबीसी 12 वर्षाखालील टी-20 क्रिकेट स्पर्धेत जाधव इलेव्हन संघाने विजयी सुरुवात केली. सामन्यात जाधव संघाने युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीवर 2 धावांनी मात केली. आर्यन चौधरी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जाधव इलेव्हन संघाने 20 षटकांत 9 बाद 100 धावा उभारल्या. यात संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर तथा कर्णधार ध्रुव पुंड भोपळाही फोडू शकला नाही. दुसरा सलामीवीर श्रीजित खंडागळेने 38 चेंडूंत 2 चौकारांसह 20 धावा केल्या. निरंजन देशमुख 2 आणि गणेश 1 धावांवर परतले. सहाव्या क्रमांकावर आलेल्या आर्यन चौधरीने सर्वाधिक नाबाद 46 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 34 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार मारले. प्रक्षित शेजुळने 9 आणि तळातील फलंदाज सचिनने नाबाद 5 धावा जोडल्या. ओम दानवे शुन्यावर परतला. युनिव्हसर्लकडून राजविर कवालने 10 धावा देत 2 आणि समर्थ जे याने 19 धावा देत 2 गडी बाद केले. विराज सावंत, कार्तिक भुमरे व प्रज्वल दिवनाळेने प्रत्येकी एक-एक गडी टिपला.

प्रत्युत्तरात युनिव्हलर्स क्रिकेट अकादमी निर्धारित षटकांत सर्वबाद 98 धावा करु शकला. संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर विराज सावंत भोपळाही फोडू शकला नाही. देवराज २ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार समर्थ जे. याने गोलंदाजीत 2 गडी बाद केल्यानंतर फलंदाजीतही सर्वाधिक 36 धावांची चांगली कामगिरी केली. त्याने 37 चेंडूंत 2 चौकार खेचले. प्रज्वल दिवनाळेने 37 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 24 धावा काढल्या. समर्थ व प्रज्वल जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 47 धावांची भागीदारी केली. मात्र ते संघाला विजय मिळवून देवू शकले नाहीत. राजवीर कवालने 14 आणि आराध्य शिंदेने 10 धावांचे योगदान दिले. जाधव संघाकडून आर्यन चौधरीने 13 धावा देत 3 गडी बाद केले. ध्रुव पांडुने 10 धावांत 2 बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...